मुंब्रा येथील रुग्णालयात मोठी आग! रुग्णांच्या मृत्यूने परिसरात हळहळ

  ठाण्यातील मुंब्रा कौसा या भागात एका खाजगी नॉन कोविड रुग्णालयात आग लागल्याची घटना समोर आली आहे. मीटर बॉक्स मध्ये अचानक लागल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे.

Updated: Apr 28, 2021, 07:49 AM IST
मुंब्रा येथील रुग्णालयात मोठी आग! रुग्णांच्या मृत्यूने परिसरात हळहळ title=

ठाणे :  ठाण्यातील मुंब्रा कौसा या भागात एका खाजगी नॉन कोविड रुग्णालयात आग लागल्याची घटना समोर आली आहे. मीटर बॉक्स मध्ये अचानक लागल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे.

प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयात ही आग लागली असून, रुग्णालयात एकूण 20 रुग्णांपैकी 6 जण ICU मध्ये उपचार घेत होते त्यांना जवळच्या बिलाल रुग्णालय येथे हलवण्यात आले.

रुग्णांना इतर रुग्णालयात हलवताना 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सध्या ICU मधील 6 जण बिलाल रुग्णालय येथे उपचार घेत आहे इतर जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे..

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन ,अग्निशमन दल, पोलीस आणि इतरांच्या मदतीने रुग्णालय येथे मदत कार्य सुरू आहे..

घटनास्थळी 4 ते 5 अग्निशमन दल गाड्या उपस्थित आहेत.