मुंबई : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण 100 टक्के भरलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून बारवी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे बारवी धरणाच्या अकरा दरवाजांपैकी पाच दरवाजामधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.
बारवी धरणातून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर महापालिका तसेच औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. धरणं पूर्ण भरल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
6 सप्टेंबरपर्यंत धरण 98 टक्के भरलं होतं. त्यामुळे धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले होते. या धरणाच्या पाणीसाठ्यावर ठाणे जिल्ह्याची तहान अवलंबून असते.