मोबाईल वॉलेटचा वापर करताना या '४' चुका करणे टाळा!

आजकाल डिजिटल ट्रानजॅक्शनचे प्रमाण वाढले आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 15, 2017, 04:22 PM IST
मोबाईल वॉलेटचा वापर करताना या '४' चुका करणे टाळा! title=
नवी दिल्ली : आजकाल डिजिटल ट्रानजॅक्शनचे प्रमाण वाढले आहे.
तरूणाई तर यालाच अधिक प्राधान्य देते. डिजिटल ट्रानजॅक्शनचे खूप पर्याय उपलब्ध आहेत. उदा. नेट बॅकींग, चेक, ड्राफ्ट, क्रेडिट, डेबिट कार्ड इत्यादी. तरी देखील सर्वात सोपा उपाय म्हणजे मोबाईल वॉलेटचा वाटतो.
 
रिपोर्टनुसार गेल्या नोव्हेंबरमध्ये मोबाईल वॉलेटमधून ट्रानजॅक्शनचे प्रमाण खूप अधिक प्रमाणात वाढले आहे. ही सुविधा सोयीस्कर असली तरी काही सावधानी घेणे गरजेचे आहे. 
मोबाईल वॉलेटचा वापर करताना या चूका करणे टाळा.

ओटीपी शेअर करू नका

ट्रानजॅक्शनसाठी येणारा ओटीपी कोणासोबतही शेअर करू नका. मोबाईल वॉलेट कंपन्या युजर्संना याबद्दल माहिती देत असतात. 

अकाऊंट लॉगआऊट करा

अनेक लोक आपले मोबाईल वॉलेट अॅपमध्ये लॉगइन केल्यानंतर लॉगआऊट करत नाहीत. अशावेळी जर तुमच्या मोबाईलला पासवर्ड नसल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. 

कॅश अॅड करताना रिफ्रेश किंवा बॅक करू नका

अनेकदा वॉलेट अकाऊंटमध्ये कॅश अॅड करताना काही नेटवर्क समस्या येऊ शकतात. अशावेळी अधिर होऊन रिफ्रेश किंवा बॅक करू नका. जोपर्यंत ट्रानजॅक्शन फेल किंवा सक्सेयसफुलचा मेसेज येत नाही तोपर्यंत असे करू नका.

अॅप लॉक करा

फोन लॉक करत नसाल तर कमीत कमी अॅप लॉक करू नका. यामुळे तुम्ही जरी मोबाईल वॉलेट मध्ये लॉगइन केले तरी ते सुरक्षित राहील. लॉक न केल्यास दुसऱ्या कोणीतरी हे वापरण्याची शक्यता असते.