केवळ १५ सेकंदात विकल्या गेल्या सर्व रॉयल इनफिल्ड

रॉयल एनफिल्डने नुकतीच आपली १५ लिमिटेड एडिशन Stealth Black क्लासिक ५०० मोटरसायकल्सची ऑनलाईन विक्री केली.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 15, 2017, 04:06 PM IST
केवळ १५ सेकंदात विकल्या गेल्या सर्व रॉयल इनफिल्ड title=

मुंबई : रॉयल एनफिल्डने नुकतीच आपली १५ लिमिटेड एडिशन Stealth Black क्लासिक ५०० मोटरसायकल्सची ऑनलाईन विक्री केली.

मोटारसायकल नॅशनल सिक्यूरीटीमार्फत ही विक्री करण्यात आली. चेन्नईमधल्या पावरफुल वाहन निर्माता रॉयल इनफिल्डने या १५ बाईक्स ऑनलाईन विक्रीसाठी ठेवल्या होत्या.

१५ सेकंदात विक्री 

 या बाईक केवळ १५ सेकंदात विकल्या गेल्याचा दावा कंपनीने केला आहे. NSG ने या वर्षी सप्टेंबरमध्ये ८००० कि.मी 'फाइट अगेंस्ट टेरर' अभियान चालवले होते. 

NSG चा लोगो

जनतेला दहशतवादाविरुद्ध जागरूक करणे हे या अभियाने उद्दीष्ट होते.  या १५ बाईक्स विकून मिळालेली किंमत दिव्यांग मुलांना दिली जाणार आहे.

कंपनीतर्फे या बाईकवर NSG चा लोगो देण्यात आला आहे. त्यामूळे इतर क्लासिक ५०० पेक्षा ही बाईक वेगळी ठरणार आहे. 

१५ हजारात बुकींग 

या बाईकची विक्री १३ डिसेंबरपर्यंत वेबसाइटवर होणार होती. सेलमध्ये भाग  घेण्यासाठी ग्राहकांना रजिस्ट्रेशन करणे गरजेचे होते.

दरम्यान ग्राहकांना एक युनीक कोड दिला गेला.

१.९० लाख इतकी बाईकची किंमत ठेवण्यात आली होती.

बुकींगसाठी १५ हजार रुपये द्यायचे होते.