शाओमी मी स्मार्ट बँड 6 लॉन्च, 14 दिवस चालणार बँटरी

शाओमीने चीनमध्ये मी बँड 5 चा अपग्रेड केलेला मी बँड 6 लॉन्च केला आहे. या कंपनीने जागतिक बाजारपेठेमध्ये नवीन फिटनेस ट्रॅकर मी स्मार्ट बँड 6 चे नाव दिले आहे. दोन्ही बँड नाव आणि काही फीचर्सचा जसे वॉच फेस, NFC, AI ला सोडून यात जास्तीत जास्त वैशिष्ट्ये सारखीच आहेत. मी बँड ६ आणि मी स्मार्ट बँड ६ मध्ये अमोलेड डिस्प्ले, ब्लड ऑक्सिजन यासारखे फीचर्स उपलब्ध आहे. फिटनेस ट्रॅकरचे वैशिष्ट्ये, आणि फीचर्स किंमतीबद्दल सविस्त जाणून घेऊ यात.

Updated: Apr 1, 2021, 02:42 PM IST
 शाओमी मी स्मार्ट बँड 6 लॉन्च, 14 दिवस चालणार बँटरी title=

नवी दिल्ली : शाओमीने चीनमध्ये मी बँड 5 चा अपग्रेड केलेला मी बँड 6 लॉन्च केला आहे. या कंपनीने जागतिक बाजारपेठेमध्ये नवीन फिटनेस ट्रॅकर मी स्मार्ट बँड 6 चे नाव दिले आहे. दोन्ही बँड नाव आणि काही फीचर्सचा जसे वॉच फेस, NFC, AI ला सोडून यात जास्तीत जास्त वैशिष्ट्ये सारखीच आहेत. मी बँड ६ आणि मी स्मार्ट बँड ६ मध्ये अमोलेड डिस्प्ले, ब्लड ऑक्सिजन यासारखे फीचर्स उपलब्ध आहे. फिटनेस ट्रॅकरचे वैशिष्ट्ये, आणि फीचर्स किंमतीबद्दल सविस्त जाणून घेऊ यात.

शाओमी मी स्मार्ट बँड 6: किंमत आणि कलर्स

शाओमी मी स्मार्ट बँड 6 ही घडी ब्लॅक, ऑरेंज, यलो, ऑलिव्ह, आयव्हरी आणि ब्लू ह्या 6 कलर मध्ये उपलब्ध आहे. मागील वर्षाप्रमाणे या वेळीही कंपनीने दोन बँडमध्ये वॅब व्हेरियंट बाजारात आणले आहे. एक व्हेरियंट NFC च्या सोबत येते. तर दुसऱ्या व्हेरियंट मध्ये NFC सपोर्ट मिळत नाही.

शाओमी मी 11 प्रो स्मार्टफोन उंचावलेला पडदा, यात स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आहे
Xiaomi Mi बॅंड 6 चा एनएफसी व्हेरिएंट चीनमध्ये 279 युआन (सुमारे 3 हजार रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे. तर स्टँडर्ड म्हणजेच नॉन एनएफसी व्हेरियंट २२९ युआन (जवळपास २५०० रुपये) मध्ये येतो.

Mi Smart Band 6: फीचर्स

मी बँड ६ फिटनेस बँड ३० एक्सरसाइज मोड सपोर्ट करतो. आउटडोर रनिंग, वॉकिंग ट्रेडमिल, रनिंग आउटडोर सायकलिंग, रोइंगला ऑटो डिटेक्ट करते. मी बँड ६ मध्ये 24×7 हार्ट रेट मॉनिटरिंग (PPG), SpO2 (ब्लड ऑक्सीजन मेजरमेंट) चे सपोर्ट मिळते.

Mi Smart ६ मध्ये तुम्हाला ट्रॅक करू शकतो. स्लीप ब्रीदिंग क्वॉलिटी, REM व नॅप टाइम संबंधी माहिती देते. याशिवाय, दुसऱ्या ट्रॅकिंग ऑप्शनसारखे जसे ब्रीद एक्सरसाइज, स्ट्रेस मॉनिटरिंग, फीमेल हेल्थ ट्रॅकिंग आणि PAI (पर्सनल एक्टिविटी इंटेलिजेंस) सुद्धा हे बँड सपोर्ट करतो. NFC वर्ज़न मल्टी-फंक्शन NFC सपोर्ट करतो. ज्यात एक टॅपवर पेमेंट केले जाऊ शकते. मी बँड ६ मध्ये Xioao AI असिस्टेंट बिल्ट-इन सपोर्ट मिळू शकतो.

कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ ५.० सपोर्ट मिळते. यात ३ अॅक्सेस एक्सीलेरोमीटर, ३ अॅक्सेस जायरोस्कोप सारखे आवश्यक सेन्सर आहे. याशिवाय, मी स्मार्ट बँड ६ स्विम-प्रूफ 5ATM वॉटर-रेजिस्टेंट, मॅग्नेटिक चार्जिंग, 125mAh LiPo बॅटरी आणि १४ दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ सारखे फीचर्सचा समावेश आहे. मी बँड 6 चे डाइमेँशन 47.4 x 18.6 x 12.7 मिलीमीटर आहे. यात 155 ते 219 मिलीमीटरची अडजस्ट केले जाऊ शकते.