भारतीय बाजारात 'शाओमी'चा 'Mi Air Purifier 3' लॉन्च

 'Mi Air Purifier 3' लॉन्च

Updated: Nov 6, 2019, 05:50 PM IST
भारतीय बाजारात 'शाओमी'चा 'Mi Air Purifier 3' लॉन्च title=

मुंबई : 'शाओमी'ने 'Xiaomi' भारतात  'Mi Air Purifier 3' लॉन्च केला आहे. यापूर्वी कंपनीने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात  'Mi Air Purifier 2' लॉन्च केला होता. 'Mi Air Purifier 3' गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आलेल्या  'Mi Air Purifier 2S' चं अपग्रेडेड वर्जन आहे. 

'एमआय प्युरिफायर ३' ची किंमत ९ हजार ९९९ इतकी आहे. Mi.com वरुन याची खरेदी करता येऊ शकते. ७ नोव्हेंबर २०१९ नंतर Mi Air Purifier 3 अॅमेझॉन इंडिया Amazon India आणि फ्लिपकार्डवरुन Flipkart खरेदी करता येऊ शकते. या फिल्टरचे प्युरिफायर २ हजार १९९ रुपयांत उपलब्ध आहे.

Mi Air Purifier 3 मध्ये ट्रिपल लेयर फिल्ट्रेशन देण्यात आला आहे. याशिवाय यात प्रायमरी फिल्टर. ट्रू HEPA फिल्टर आणि अॅक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर आहे. अॅक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर हवेत असणाऱ्या फॉरमेलेडिहाइज, टॉक्सिक दूर ठेवण्यास मदत होते.

  

Mi Air Purifier 3 शिवाय कंपनी Mi Air Purifier 2C ६ हजार ४९९ रुपये आणि Air Purifier 3 ९ हजार ९९९ रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध आहे.