नवी दिल्ली : अमेरिकेची मल्टिनॅशनल आणि टेलीकॉम्युनिकेशन इक्यूपमेंट कंपनी क्वालकॉम ही ५ जी स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानावर काम करत होती. क्वालकॉम व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्या ५जी च्या निर्मितीवर काम करत आहेत. मात्र क्वालकॉम अधिक जलद आणि जोरदार काम करत आहे. वृत्तानुसार २०२० मध्ये क्वालकॉम ५जी स्मार्टफोन सादर करेल.
क्वालकॉमचा ५जी स्मार्टफोन :
क्वालकॉम ही कंपनी ५जी स्मार्टफोनवर काम करत असून त्याचा एक फोटो लीक झाला आहे. Sherif Hanna यांनी ट्विटरवर ५जी स्मार्टफोनचा फोटो पोस्ट केलं आहे. Sherif Hanna हे क्वालकॉम या कंपनीत एलटी आणि ५जी एनआर मध्ये मार्केटिंग लीड या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शेअर केल्यामुळे लवकरच ही कंपनी ५जी स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र फोन २०१९ पासून युजर्सना उपलब्ध होईल, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.
Hard to believe that I have the world's first 5G smartphone in my hand! pic.twitter.com/b180MawEyT
— Sherif Hanna (@sherifhanna) October 25, 2017
या फोटोमध्ये फोनचं रियर पॅनल दिसत आहे. यात ड्युअल कॅमेऱ्यासह ड्यूल एलईडी फ्लॅश दिलेला आहे. त्यात फोनच्या खालच्या भागात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चा लोगो आहे. ट्विटनुसार हा फोन मल्टी मोड म्हणजेच २जी, ३जी, ४जी आणि ५जी ला सपोर्ट करेल.
क्वालकॉम ने ४जी-५जी समिट दरम्यान स्नॅपड्रॅगन एक्स ५० हा ५जी मॉडम सादर केला होता. कंपनीने सिंगल-चिप ५जी मॉडमच्या माध्यमातून ५जी डेटा कनेक्टिविटीचा डेमो दिला आहे. कंपनीने वेगवेगळे १०० मेगाहर्ट्ज ५ जी कंपन्या आणि २८ गीगाहर्ट्ज mm स्पेकट्रम वर ५जी चा डेमो दिला. या ५जी मॉडमतर्फे कंपनी १ गीगाबाईट प्रति सेकंद चा डाउनलोड स्पीड उपलब्ध असेल आणि २८ गीगाहर्ट्ज mmWave रेडियो फ्रीक्वेंसी बँडचा डेटा कनेक्शन देखील दिले जाईल.
५जी नेटवर्कच्या डेमोसाठी SDR051 mmWave आरएफ ट्रांसीवर इंटीग्रेटेड सर्किट (IC) चा वापर केला जाईल. त्याचबरोबर क्वालकॉम ने आपल्या पहिल्या ५जी स्मार्टफोनचे रेफरेंस डिजाइन देखील दाखवले. ५जी मॉडेम सादर करणारी क्वालकॉम ही पहिली कंपनी आहे.