नवी दिल्ली : नवनवे स्मार्टफोन सातत्याने मार्केटमध्ये येत असतात. त्यातच एका कंपनीने जगातील सर्वात छोटा फोन सादर केला आहे. फोन पाहुन तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. या फोनमधून फोन किंवा मेसेज करता येईल, असे तुम्हाला वाटणारही नाही. मात्र हे खरे आहे की, हा फोन चक्क आपल्या अंगठ्याएवढा आहे. तो तुमच्या मुठीत सहज राहील. हा फोन फक्त लहान नाही तर पातळ देखील आहे. दोन रूपयाचे नाणे देखील या फोनपेक्षा जाड असेल.
गॅझेट लव्हर्ससाठी हा फोन म्हणजे पर्वणीच असेल. हा स्मार्टफोन १.८२ इंचाचा आहे. याचे वजन १३ ग्रॅम आणि लांबी २१ एमएम आहे. यात फुल्ली फंक्सनल किबोर्ड आणि स्पीकर आहेत.
जेनको कंपनीचा हा सर्वात लहान फोन २ जी नेटवर्कवर काम करेल. हा एक प्रकारचा टॉक अंण्ड टेक्स्ट मोबाईल आहे. यात कोणत्याही प्रकारची इंटरनेट कनेक्टिविटीची सुविधा दिली गेली नाहीये.
या फोनचे नाव जेनको टिनी टी1 आहे. याची बॅटरी जबरदस्त आहे. बॅटरीत ३ दिवसांचा स्टॅंडबाय बॅकअप आणि १८० मिनीटांचा टॉक टाईम आहे. यात देखील स्मार्टफोनप्रमाणे नॅनो सिम वापरावे लागेल.
जेनको टिनी टी1 या स्मार्टफोनमध्ये तुम्ही ३०० लोकांचा नंबर सेव्ह करू शकता. यात ५० हुन अधिक मेसेज स्टोर केले जातील. त्याचबरोबर फोनमध्ये ३२ जीबी रॅम आणि ३२ जीबी रोम आहे. तसंच मायक्रो USB चार्जर देखील देण्यात आला आहे.
या फोनची किंमत ३० युरो म्हणजेच सुमारे २,२८० रुपये आहे. कंपनी या फोनची जगातील सर्व देशात विक्री करणार आहे. मे २०१८ पासून त्याला सुरूवात होईल.
जेनको (Zanco)या कंपनीने हा फोन बनवला आहे. या कंपनीची स्थापना २००७ मध्ये झाली. सुरूवातीपासूनच सर्वात लहान फोन बनवण्याचा कंपनीचा उद्देश होता. आणि अखेर कंपनीने ते साध्य केले. ही कंपनी जिनी मोबाइल्स लिमिडेटची परेंट कंपनी आहे. जेनेको हा दक्षिण आशिया, आफ्रिका, ब्रिटेन, दक्षिण अमेरिका आणि युरोपमधील चांगला नावाजलेला ब्रॅंड आहे.