WiFi कासवाच्या गतीने चालतंय? हे उपकरण जोडल्यानंतर सुपरफास्ट, काही मिनिटांत डाऊनलोड होईल Movie

Wi-Fi Range Extender:  वायफायचा वेगही कमी होतो. अगदी कासवाच्या गतीने चालते. त्यामुळे अनेकदा काम करताना समस्या येते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशा उपकरणाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे वेग वाढेल आणि काही मिनिटांत मोठ्या आकाराचा सिनेमा (Movie) डाऊनलोड होईल.

Updated: May 2, 2022, 09:43 AM IST
WiFi कासवाच्या गतीने चालतंय? हे उपकरण जोडल्यानंतर सुपरफास्ट, काही मिनिटांत डाऊनलोड होईल Movie title=

मुंबई : Wi-Fi Range Extender: WiFi चा वापर झपाट्याने वाढत आहे. अनेकवेळा या वायफायचा वेगही कमी होतो. अगदी कासवाच्या गतीने चालते. त्यामुळे अनेकदा काम करताना समस्या येते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशा उपकरणाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे वेग वाढेल आणि काही मिनिटांत मोठ्या आकाराचा सिनेमा (Movie) डाऊनलोड होईल.

 कोविडपासून वायफायचा वापर झपाट्याने वाढला आहे. घरुन काम करणं आणि ऑनलाइन क्लासेसवर काम करणाऱ्यांसाठी वायफाय खूप महत्त्वाचे झाले आहे. अधिक स्पीडसाठी लोक मोबाईल इंटरनेटऐवजी वाय-फाय वापरतात, परंतु काही वेळा वायफायचा वेगही मंदावतो होतो. त्यामुळे सर्व कामे ठप्प होत असतात.  

WiFi रेंज विस्तारक

आपण ज्या उपकरणाबद्दल बोलत आहोत, त्याला वायफाय रेंज एक्स्टेंडर म्हणतात. हे तुमच्या वायफायची सिग्नल स्ट्रेंथ वाढवण्यास मदत करते. घरी ते जोडल्यानंतर, आपल्याला सिग्नलबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमचा वायफाय वेगवान गतीने सतत काम करेल.

TP-Link RE300 AC1200 Mesh Wi-Fi Range Extender

जर तुमच्या घरातील वायफाय सिग्नल खूप कमी असेल आणि तुम्ही कमी स्पीडमध्ये काम करत असाल तर तुमच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे उपकरण जोडल्यानंतर वेग सुपरफास्ट होईल. तुम्हाला फक्त ते प्लग इन करायचे आहे, जसे तुम्ही प्लगमध्ये डासांपासून बचाव करणारे यंत्र बसवता, तसे. तो चालू होताच वायफायचा वेग वाढतो.

किंमत खूप कमी

TP-Link RE300 AC1200 Mesh Wi-Fi Range Extender ची किंमत 5,999 रुपये असली तरी Amazon वरुन 2,399 रुपयांना खरेदी करता येईल. म्हणजेच या डिवाइसवर सध्या 3,600 रुपयांची सूट दिली जात आहे.