मुंबई : आजच्या युगात स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरत नाही असा क्वचितच कोणी व्यक्ती असेल. परंतु अनेक वेळा असे घडते की, फोनचे इंटरनेट खूप स्लो चालू लागते, त्यामुळे अनेक कामांमध्ये व्यत्यय येतो. तसेच फोन देखील फार स्लो चालू लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फोनचा डेटा स्पीड फास्ट करू शकता.
तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड कमी आहे, कारण तुमचे डिव्हाइस स्लो नेटवर्क बँडविड्थ पकडू लागते. खरे तर, नेटवर्क प्रदाते वेगवेगळ्या बँडविड्थचे नेटवर्क रिलीझ करतात, ज्यात 3G, 4G आणि LTE समाविष्ट आहे.
काहीवेळा तुमचा फोन स्लो बँडविड्थवर आपोआप स्विच होतो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अनेक वेळा असे दिसून आले आहे की, रेंजमध्ये परत आल्यानंतरही फोन आपोआप वेगवान बँडविड्थसह नेटवर्कवर स्विच होत नाही. तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन हे बदलू शकता.
सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जा आणि 'नेटवर्क ऑपरेटर'चा पर्याय निवडा. येथे तुम्हाला 'Choose Automatically' नावाचा पर्याय दिसेल, तो बंद करा.
तुम्ही तो पर्याय बंद करताच तुमच्यासमोर नेटवर्क प्रोव्हायडरची यादी येईल, ज्यामधून तुम्हाला तुमच्या टेलिकॉम कंपनीचा पर्याय निवडावा लागेल. तुमची कंपनी निवडल्यानंतर फोनची सेटिंग्ज बंद करा आणि तुमचा फोन एकदा रीस्टार्ट करा. अशा प्रकारे तुम्ही फोनचा वेग वाढवू शकाल.
तुम्ही ही युक्ती कोणत्याही परिस्थितीत वापरू शकता, परंतु कधीकधी तुम्ही अशा भागात असाल जिथे कंपनीचे जास्त टॉवर नाहीत. अशा ठिकाणी ही युक्ती काम करणार नाही, कारण नेटवर्क प्रदात्याला चांगला डेटा स्पीड देण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी ही युक्ती कामी येणार नाही.