'या' लोकांना असते सोशल मीडियावर Block करण्याची सवय, जाणून घ्या

या कारणामुळे तुम्हाला सोशल मीडियावर Block केलं जातं, 'ही' आहेत कारण 

Updated: Jul 29, 2022, 04:01 PM IST
'या' लोकांना असते सोशल मीडियावर Block करण्याची सवय, जाणून घ्या title=

मुंबई : सोशल मीडियावर ब्लॉक आणि अनब्लॉकचा पर्याय तुम्हाला माहितीच असेल. अनेकदा तुमची गर्लफ्रेड तुमच्याशी नाराज असेल तर तुम्हाला ब्लॉक करते. हे एखाद्या मित्राबाबतही होते, त्याच्याशी वाद झाला की आपण त्याला ब्लॉक करतो. मात्र सोशल म़ीड़ियावर का ब्लॉक केलं जाते याची कारणे माहीती आहेत का तुम्हाला, नाही ना मग जाणून घेऊयात.  

विनाकारण नाराजी
कदाचित आपण ज्या व्यक्तीशी बोलू इच्छित आहात ती एखाद्या गोष्टीवरून आपल्यावर रागावलेली असेल. त्यामुळे तुम्हाला ब्लॉक करण्यात येते. ही सवय नंतर नात्यात तणाव आणते. कारण नाराजी असताना समोरचा तुम्हाला पुन्हा पुन्हा अनब्लॉक करत राहतो.

असुरक्षित वाटणे
एखाद्याला तुमच्याबद्दल इनसिक्युर वाटते तेव्हा तुम्हाला ब्लॉक केलं जाऊ शकतं. तुमच्याशी बोलल्याने त्याचे नुकसान होऊ शकते अशी त्याला भीती असते.  

अपमानित करणे
जेव्हा एखाद्याला असे वाटते की समोरचा व्यक्ती गरजेचा नाही आहे किंवा त्यांच्यासाठी अजिबात महत्त्वाचा नाही. त्यावेळी तुम्हाला ब्लॉक केले जाऊ शकते. अनेक वेळा लोक न सांगता एखाद्याचा अपमान करण्यासाठी हा मार्ग निवडतात.

स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी 
अनेकदा शाब्दिक वादात पराभवाचा धोका असतो. अशा परिस्थितीत लोक स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी तथ्य टाळण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्हाला ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतात.

काहीतरी लपवण्याचा प्रयत्न 
जेव्हा लोक काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते ब्लॉक करतात. जे ते कोणत्याही परिस्थितीत इतरांसमोर उघड करू इच्छित नसतात म्हणून ते ब्लॉक करतात.