WhatsApp वर येणाऱ्या संदेशाची सत्यता जाणून घेण्यासाठी आलं नवीन फिचर!

WhatsApp ने ही सेवा अफवा आणि चुकीच्या सूचना पसरु नये म्हणून सुरु केली आहे.

Updated: Apr 3, 2019, 07:15 PM IST
WhatsApp वर  येणाऱ्या संदेशाची सत्यता जाणून घेण्यासाठी आलं नवीन फिचर!  title=

मुंबई : सध्या  WhatsApp वर चुकीचे किंवा अफवा पसरवणारे मेसेज खूप प्रमाणात शेअर केले जात आहेत. याच दरम्यान, ऐन तोंडावर आलेली 2019ची लोकसभा निवडणुकीत नेटकऱ्यांना चांगलाच जोर सुटला आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर  WhatsApp कंपनीने अशा चुकीच्या मेसेजेसना आळा घालण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची हेल्पलाईन सुरु केली आहे.

मेसेजिंग सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या  WhatsApp कंपनीने नवीन "Tipline" नावाची हेल्पलाईन  सुरु केली आहे. या हेल्पलाईनच्या मदतीने युजर WhatsApp वर येणाऱ्या चुकीच्या  मेसेजची सत्यता जाणू शकेल. 

WhatsApp ने ही सेवा अफवा आणि चुकीच्या सूचना पसरु नये म्हणून सुरु केली आहे.  कोणत्याही युजरच्या  WhatsApp वर मेसेज आला तर तो मेसेज "Tipline" या हेल्पलाईनच्या मदतीने पडताळू शकता. 

WhatsAppच्या म्हणण्याप्रमाणे या हेल्पलाईनची सेवा 2019ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरु करण्यात आली आहे.  WhatsAppचे भारतात 23 करोड वापरकर्ते आहेत.

'हिन्दुस्तान टाईम्स' च्या वृत्तानुसार फेसबुकने सांगितलं आहे की, ते एक भारतीय स्टार्टअप सोबत काम करत आहेत. कारण आलेला मेसेज बरोबर, चुकीचा, फसवणारा किंवा अफवा पसरवून जनतेत तणाव निर्माण करणार तर नाही ना? याच पार्श्भूमीवर ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही भारतीय युजरला कोणतीही सूचना अथवा मेसेच चुकीचा वाटत असेल, तर तो  WhatsAppच्या चेकपाँईट टिपच्या साहाय्याने पडताळू शकतो. जर कोणताही युजर "Tipline" वर संशयास्पद मेसेज अथवा सूचना शेयर करेल, तर व्हेरीफिकेशन, सेंटर त्या युजरला शेयर केलेला मेसेज चुकीचा आहे, की बरोबर हे पडताळण्यासाठीचा रिप्लाय करेल.

व्हेरीफिकेशन सेंटरचं काम असंही असेल, ते चुकीच्या  किंवा संशयास्पद मेसेजचा अथवा सुचनांचा डाटाबेस तयार करेल. त्यात टेक्स्ट, फोटो किंवा व्हीडिओ अशा पद्धतीचा कोणताही मेसेज राहिला, तरी त्याचा डाटाबेस तयार होईल. विशेष बाब म्हणजे या हेल्पलाईनमध्ये हिन्दी, तेलूगु, बंगाली मलयालम आणि इंग्लिश या सर्व भाषांमध्ये मदत मिळेल.