Whatsapp Update: WhatsApp युजर्ससाठी नवीन नवीन अपडेट्स घेऊन येते. व्हॉट्सअॅप युजर्स फ्रेंडली, प्रायव्हसी आणि सिक्युरिटीसाठी नवीन अपडेट येत असतात. अँड्रोइट, आयओएससह वेबसह सर्व व्हॉट्सअॅप व्हर्जन्ससाठी प्रत्येक महिन्याला नवीन सिस्टम अपडेट होत असतात. नवीन ऑपरेटिंग सिस्टमसाठीदेखील नव नवीन अपडेट येत असतात. व्हॉट्सअॅप जुन्या ऑपरेटिग सिस्टमसाठीदेखील सपोर्ट करणे बंद होते.
व्हॉट्स्अॅपने अलीकडेच एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार 24 ऑक्टोबरनंतर अँड्रोइड ओएस व्हर्जन 4.1 असलेल्या स्मार्टफोनसाठी सपोर्ट बंद करणार आहे. म्हणजेच, या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप आता सुरू करता येणार नाही. कोणते कोणते असे फोन आहेत ज्यावर व्हॉट्सअॅप सुरू होणार नाही याची यादी जाणून घेऊया.
तुमच्या जवळही जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारा फोन आहे. तर आत्ताच अपग्रेड करुन घ्या. कारण सामान्यतः जुने फोन नेहमीच नवीन अॅप आणि सिक्युरिटी अपडेट करत नाहीत. त्यामुळं तुमचा फोन असुरक्षित ठरु शकतो तसंच, त्याचा वापर करणेही धोक्याचे ठरु शकते. तुमच्या स्मार्टफोनच्या अँड्रोइड ओएस व्हर्जनच तुम्हाला माहिती नसेल तर या पद्धतीने माहिती करुन घ्या. स्मार्टफोनवरील सेटिंग्समध्ये जाऊन मेन्यूवर क्लिक करुन तुम्ही पाहू शकता. सेटिंग्स> अबाउट फोन> सॉफ्टवेअर वर क्लिक करुन ऑपरेटिंग सिस्टिमबद्दल माहिती मिळवू शकता.
ज्या युजर्सची डिव्हाईस जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालत आहेत त्यांना व्हॉट्सअॅप आगाऊ माहिती देईल. व्हॉट्सअॅप त्या यूजर्सला अनेक वेळा अपग्रेड करण्याची आठवण करून देईल. जर वापरकर्त्यांनी त्यांचे डिव्हाइस अपडेट केले नाही तर, WhatsApp त्यांच्या डिव्हाइसवर काम करणे थांबवेल. याचा अर्थ तुम्हाला मेसेज येणार नाहीत तसेच तुम्ही ते पाठवूही शकणार नाहीत. त्याचबरोबर इतर कोणतेही WhatsApp चे फिचर वापरू शकणार नाहीत.
Nexus 7 (upgradable to Android 4.2)
Samsung Galaxy Note 2
HTC One
Sony Xperia Z
LG Optimus G Pro
Samsung Galaxy S2
Samsung Galaxy Nexus
HTC Sensation
Motorola Droid Razr
Sony Xperia S2
Motorola Xoom
Samsung Galaxy Tab 10.1
Asus Eee Pad Transformer
Acer Iconia Tab A5003
Samsung Galaxy S
HTC Desire HD
LG Optimus 2X
Sony Ericsson Xperia Arc3