WhatsApp वर Good Morning चे मेसेज पाठताय? तर अकाऊंट होऊ शकतं बॅन

WhatsApp ban Rule : व्हॉट्सअपवर तुम्ही देखील या चुका करत असाल तर मग तुमचं अकाऊंट बंद होऊ शकतं.

Updated: Oct 19, 2022, 06:13 PM IST
WhatsApp वर Good Morning चे मेसेज पाठताय? तर अकाऊंट होऊ शकतं बॅन title=

मुंबई : आपण सकाळी उठल्यानंतर आधी WhatsApp चेक करतो. कोणी काही महत्त्वाचा मेसेज पाठवलाय का ते तपासतो. पण या दरम्यान अनेक जणांचा सुप्रभात किंवा Good Moarning सारखेच अनेकांचे मेसेज आलेले असतात. पण तुम्ही पण जर Whatsapp खूप गुड मॉर्निंग मेसेज पाठवत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. यामुळे तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट बॅन होऊ शकते. (WhatsApp good morning message ban)

एका रिपोर्टनुसार, कंपनी याला स्पॅम ठरवू शकते आणि तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट बॅन करू शकते. एकच मेसेज अनेकांना पाठवला तर तो मेसेज चुकीची माहिती पसरवणारा मेसेजे गृहीत धरुन व्हॉट्सअॅप तुमचं अकाउंट बंद करु शकते.

लाखो भारतीय व्हॉट्सअॅप खाती अनेक वेळा बॅन झाल्याची बातमी तुम्ही ऐकली असेल. कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन केल्यामुळे अशा अकाऊंटवर कंपनी कारवाई करते. कंपनीने अनेक कारणे दिली आहेत ज्यामुळे तुमचे अकाऊंट बंद केले जावू शकते. कोणते आहेत ती कारणे जाणून घेऊया.

फॉरवर्डेड मेसेज

जर तुम्ही एखादा मेसेज बहुतांश लोकांना फॉरवर्ड करत असाल तर तुमचं अकाऊंट बंद होऊ शकतं. त्यामुळे मेसेज फॉरवर्ड करताना मर्यादा पाळली पाहिजे. जर तुम्हाला हा मेसेज कुठून आलाय हे माहिती नसेल तर तो मेसेज चुकूनही फॉरवर्ड करु नका. चुकीची माहिती देणारे मेसेज फॉरवर्ड करताना काळजी घ्या.

ब्रॉडकास्ट फीचरचा चुकीचा वापर

व्हॉट्सअॅपच्या ब्रॉडकास्ट फीचरचा जर तुम्ही चुकीचा वापर करत असाल तर तुमचं अकाऊंट बंद होऊ शकतं. अनेकाना एकाच वेळी मेसेज पाठवण्यासाठी याचा वापर केला जातो. पण यासाठी समोरच्या व्यक्तीकडे तुमचा नंबर सेव्ह असणं महत्त्वाचं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप

तुम्ही परवानगीशिवाय एखाद्याला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केल्यास तुमचे अकाउंट बॅन होऊ शकते. कंपनीने म्हटले आहे की, जर कोणी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मेसेज करुन ही इग्नोर करत असेल. तर तुम्ही मेसेज करून त्रास देऊ नका अन्यथा खाते ब्लॉक केले जाऊ शकते.

अकाऊंट बॅन झाले तर काय करावे

WhatsApp च्या धोरणाचे उल्लंघन केल्याने जर तुमचे खाते ब्लॉक झाले असेल तर तुम्ही ते परत मिळवण्यासाठी अपील करू शकता. त्यानंतर कंपनी त्यावर तुम्हाला अकाऊंट परत द्यायचं की नाही ते ठरवेल.