Auto Start-Stop Function in maruti: गाडी घेऊन तिचं मेन्टेनन्स ठेवणं गरजेचं आहे. नाही तर महागडी गाडी दारात उभी ठेवून उलट जास्त खर्चिक ठरते. त्यामुळे गाडी रोजच्या रोज चालवणं आवश्यक आहे. पण पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे गाडी चालवणं जीवावर येतं. पण आता पेट्रोल वाहनांमध्ये मायलेज वाढवण्यासाठी काही कंपन्यांनी फीचर्स देण्यास सुरुवात केली आहे. मारुती सुझुकीनेही आपली वाहनात असं फीचर दिलं आहे. पण अनेकांना याबाबत माहिती नाही. मारुतीच्या कारमध्ये ऑटो स्टार्ट/स्टॉप असे फीचर दिलं आहे. मारुती सुझुकी ब्रेझा, सियाझ, बेलानो, डिझायर आणि एर्टिगा यासह सर्व वाहनांमध्ये हे फीचर दिलं आहे. हे फीचर कसे काम करते ते जाणून घेऊया
या फीचरला idle start/stop असंही म्हटलं जातं. जेव्हा वाहन 5-10 सेकंदांसाठी निष्क्रिय असते तेव्हा Idle-Start-Stop फीचर इंजिन बंद करते. ट्रॅफिक सिग्नलवर गाडी दोन ते तीन मिनिटं थांबते अशा वेळी ब्रेक लावल्यास गाडीचे इंजिन काही सेकंद थांबल्यानंतर आपोआप बंद होते. याला आयडल पोजिशन म्हणतात. जोपर्यंत तुम्ही ब्रेकवरून पाय काढत नाही तोपर्यंत इंजिन बंद राहील. ब्रेकवरून पाय काढताच, इंजिन आपोआप सुरू होईल आणि वाहन चालू होईल. अशा प्रकारे इंधनाची बचत होते आणि गाडी चांगला मायलेज देते.
Mr. Bean च्या गाडीसारखी Electric Car लाँच! एका चार्जमध्ये कापणार 240 किमी
पण या फीचरमुळे अनेक लोक त्रस्त झाले आहेत. अशा लोकांना एक बटण देखील आहे. हे बटण मारुती कारमधील स्टीअरिंगच्या उजव्या बाजूला असते. त्यावर A लिहिले आहे. येथून तुम्ही ऑटो स्टार्ट/स्टॉप करू शकता.