मुंबई : WhatsApp आपल्या युजर्सना नवनवीन फीचर्स देत आहे, त्यामुळे Appमध्ये त्यांची आवड निर्माण होत आहे. या वर्षाच्या सुरुवातीस, WhatsAppने आपल्या वापरकर्त्यांना बरेच अपडेट दिले आहेत. आता WhatsApp आपल्या यूजर्सना आणखी एक अपडेट देणार आहे, ज्याची ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. WhatsApp वापरकर्ते आता संदेशांना iMessage सारखी प्रतिक्रिया देऊ शकतील.
WhatsApp काही महिन्यांपूर्वीच आपल्या चॅटिंग प्लॅटफॉर्मसाठी iMessage सारख्या फीचर्सवर काम करत होते, पण आता हे फीचर युजर्ससाठी पूर्णपणे तयार आहे.
WABetaInfo ने WhatsAppच्या प्रतिक्रियेचे काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, ज्यामुळे आपल्याला हे फीचर लाइव्ह झाल्यानंतर कसे दिसेल याची कल्पना येते.
WhatsApp वापरकर्त्यांना मेसेजच्या अगदी वरती इमोजीची एक ओळ दिसेल. अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की, ही इमोजी वापरण्यासाठी काही सेकंद क्लिक करून ठेवावे लागेल की, त्यासाठी वेगळे बटण असेल.
रिपोर्टनुसार, मेसेज प्रतिक्रिया एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह असेल, परंतु सध्या याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध होत आहे.
WhatsApp आणखी एका नवीन अपडेटवर काम करत आहे, ज्यामध्ये वापरकर्ते दोन दिवसांनंतरही चुकून पाठवलेले संदेश हटवू शकतात. WhatsApp 'डिलीट फॉर एव्हरीवन' फीचरची टाइमलाइन दोन दिवस 12 तासांनी वाढवण्यावर काम करत आहे.
सध्या, वापरकर्त्यांना एक तास, आठ मिनिटे आणि 16 सेकंदांसाठी डिलिट फॉर एव्हरीवनचा पर्याय उपलब्ध आहे.