Whatsapp, Instaram आणि Facebook यूजर्ससाठी मोठी बातमी

तुम्ही Whatsapp, Instaram आणि Facebook वापरता मग, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. 

Updated: Sep 27, 2022, 05:33 PM IST
Whatsapp, Instaram आणि Facebook यूजर्ससाठी मोठी बातमी title=
Whatsapp, Instaram and Facebook Big news for users nm

Apps Update: तुम्ही Whatsapp, Instaram आणि Facebook वापरता मग, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. कंपनी नव्या फीचर्ससाठी पैसे घेणार आहे. मिळालेल्या अहवालानुसार यासाठी Meta ने नवीन विभाग बनवला आहे. सोशल मीडियातील दिग्गज कंपनीने एक नवीन प्रोडक्ट ऑर्गेनाइजेशन सेटअप तयार केला आहे. हा विभाग Whatsapp, Instaram आणि Facebook वरील पेड फीचर्सवर काम करणार आहे. 

सोशल मीडियावरील इतक कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर Snap आणि  Twitter या पूर्वीपासूनच पेड सर्विसेस ऑफर करत आहेत. यावर यूजर्सला Twitter  Blue आणि Snapchat+  या सर्विस देतात. याशिवाय या कंपन्या अजून काही एक्स्ल्युझिव्ह फीचर्स देतात. (Whatsapp, Instaram and Facebook Big news for users nm)

काय आहे कंपनीचा प्लान?

Meta  नवीन विभाग New Monetization Experiences हा फेसबूक, इंस्टाग्राम आणि Whatsapp च्या पेड फीचर्सवर काम करेल. या विभागाला प्रतिति राय चौधरी लीड करणार आहेत.  Twitter चा वापर करणारे यूजर्स ट्वीटर ब्लूसाठी महिन्यांला 400 रुपये देतात. तर Snap आपल्या यूजर्सकडून Snapchat+ साठी महिन्यांला 49 रुपये घेतात.  आता सोशल मीडियामधील या नावाजलेल्या कंपन्या यूजर्सकडून किती पैसे घेणार आहेत ते पाहवं लागणार आहे.