WhatsApp ने आणलं नवीन फीचर, आता DPच्या जागी 'ही' नवीन गोष्टी ठेवता येणार

WhatsApp च नवीन फीचर आलं समोर, 'या' सेटींग्ज करून वापरता येणार 

Bollywood Life | Updated: Oct 21, 2022, 11:02 PM IST
WhatsApp ने आणलं नवीन फीचर, आता DPच्या जागी 'ही' नवीन गोष्टी ठेवता येणार title=

मुंबई : जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) युझर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असते. या फिचर्सची य़ुझर्सनाही उत्सुकता असते.आता असेच व्हॉट्सअ‍ॅपने बीटा (WhatsApp Beta) वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर घेऊन आला आहे. हे नवीन फिचर काय आहे? व ते तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कसे सुरु करता येणार हे जाणून घ्या.  

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) युझर्ससाठी नवीनवीन फिचर्स आणत असते. आता असेच नवीन फिचर्स व्हॉट्सअ‍ॅप घेऊन आला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने बीटा (WhatsApp Beta)  वापरकर्त्यांसाठी हे नवीन फीचर आणलंय. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रोफाइल फोटोच्या जागी अवतार सेट करू शकता. तसेच, तुम्ही हे अवतार चॅटिंगमध्ये स्टिकर्स म्हणून वापरू शकता.

असा सेट करता येणार अवतार? 

  • तुम्हाला जर हे फिचर वापरायचं असेल, तर आम्ही तुम्हाला त्या संबंधित सेटींग्स सांगतो.
  • तुम्हाला सर्वप्रथम WhatsApp Setting मध्ये जावे लागेल.
  • तुम्हाला खात्याच्या खाली अवतारचा पर्याय मिळेल. 
  • या पर्यायावर क्लिक केल्यास तुमचा Avatar तयार होईल.
  • यासोबतच तुमच्यासाठी Avatar स्टिकर पॅकही तयार केला जाईल, जो तुम्ही Chattingमध्ये वापरू शकता. 
  • तुम्ही हे Avatar तुमच्या Profile Photo साठी देखील वापरू शकता.

'या' य़ुझर्सना वापरता येणार

हे वैशिष्ट्य WABetaInfo द्वारे स्पॉट केले गेले आहे. हे फीचर अँड्रॉइड, आयओएस आणि डेस्कटॉप यूजर्ससाठी लवकरच जारी केले जाऊ शकते. सध्या, हे वैशिष्ट्य WhatsApp बीटा Android 2.22.23.9 आणि Android 2.22.23.8 वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

व्हॉट्सअॅपने हे फीचर फक्त काही बीटा (WhatsApp Beta)  वापरकर्त्यांसाठी जारी केले आहे. जर तुम्हाला हे फीचर मिळत नसेल तर तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागेल. येत्या काही दिवसांत हे फीचर इतर युजर्सना वापरता येणार आहे.