मुंबई : जगात सगळ्यात जास्त वापरल्या जाणऱ्या चॅटींग ऍप व्हॉट्सऍपवर सगळ्याच हॅकर्सचं लक्ष असतं. कारण यामुळे त्यांना आपले बँक अकाउंट्स किंवा इतर प्रकारची माहिती मिळू शकते जी त्यांच्या फायद्याची असते. तसेच व्हॉट्सअॅपवर लोकं बातमीची खात्रीन करता सरसकट सगळ्यांना मॅसेज फॅारवर्डकरात आणि याच गोष्टीचा फायदा हे हॅकर्स घेतात.
सध्या व्हॉट्सअॅपवर एक लिंक शेअर केली जात आहे. ज्यामध्ये तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा व्हॉट्सअॅप गुलाबी रंगाचा दिसू लागेल. या लिंकमध्ये दावा केला जात आहे की, यामुळे तुमच्या मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍपचा थीम कलर बदलून हिरव्याचा गुलाबी होईल. तसेच या लिंकमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, या पिंक व्हाट्सएपमध्ये बरेच नवीन फीचर आहेत.
सायबर तज्ज्ञांनी लिंकद्वारे फोनवर व्हायरस पाठवण्यात येणाऱ्या या गोष्टींविषय़ी व्हाट्सएप यूझर्सना इशारा दिला आहे. परंतु सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या लिंकवर क्लिक केल्यानंतर संबंधित यूझर्सचा फोन हॅक होईल आणि त्यांना व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.
सायबर सिक्योरीटी तज्ञ राजशेखर राजरिया यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "व्हाट्सएप पिंक बद्दल सावधगिरी बाळगा! एपीके डाउनलोड लिंकसह व्हाट्सऍप हा व्हायरस ग्रुपमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हाट्सऍप पिंक या नावाच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला फोन वापरणे कठिण होईल."
Beware of @WhatsApp Pink!! A Virus is being spread in #WhatsApp groups with an APK download link. Don't click any link with the name of WhatsApp Pink. Complete access to your phone will be lost. Share with All..#InfoSec #Virus @IndianCERT @internetfreedom @jackerhack @sanjg2k1 pic.twitter.com/KbbtK536F2
— Rajshekhar Rajaharia (@rajaharia) April 17, 2021
सायबरसुरिटी कंपनी वोयागेर इनफोसेस चे संचालक जितेन जैन म्हणाले की, "यूझर्सने एपीके किंवा इतर लिंकवरुन कोणताही ऍप डाऊनलोड करु नका. गुगल स्टोअर किंवा ऍपल्सच्या अधिकृत ऍप स्टोअरवर जाऊनच ऍप डाऊनलोड करा.
या प्रकारासाठी व्हाट्सऍपशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "जर कोणाला संशयास्पद संदेश किंवा ई-मेलसहित संदेश मिळाला असेल तर त्याला उत्तर देण्यापूर्वी सावधगिरी बाळगून त्याची सखोल चौकशी करा." व्हॉट्सऍपसाठी आम्ही सूचना करतो की, आम्ही दिलेल्या सुविधांचा वापर करा आणि आम्हाला रीपोर्ट पाठवा, ज्याने या प्रकारचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे त्या विषयी माहिती द्या किंवा त्या व्यक्तीला ब्लॉक करा."