Crime News: Youtube वर Video पाहताय? तुमचं बँक खातं होईल रिकामं, अशी घ्या काळजी!

Cyber Crime News:  एआय सायबर सिक्युरिटी (AI Cyber Security) कंपनी क्लाउडसेकच्या (CloudSEK) संशोधकांच्या मते, यूट्यूब व्हिडिओद्वारे हल्ल्यांमध्ये 200 ते 300 टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

Updated: Mar 14, 2023, 07:34 PM IST
Crime News: Youtube वर Video पाहताय? तुमचं बँक खातं होईल रिकामं, अशी घ्या काळजी! title=
Youtube

Youtube Cyber Crime: लोकांच्या हातात स्मार्टफोन आल्यापासून सोशल मीडियाचा (Social Media) वापर चांगलाच वाढला आहे. जगातील सर्वात मोठ्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या युट्यूब (Youtube) वर दररोज लाखो व्हिडिओ अपलोड केले जातात. तर करोडो वापरकर्ते व्हिडिओ (Youtube Video) आवर्जुन पाहतात. मात्र, युट्यूबवर व्हिडिओ पाहणं महागात पडू शकतं. तुम्ही कंगाल देखील होऊ शकता. त्यामुळे योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. (watching youtube videos can empty your bank accounts warns security researchers cyber crime news)

बँक खातं होईल रिकामं

काही युट्यूब (Youtube) व्हिडिओमध्ये मालवेअरशी संबंधित लिंक असू शकतात, ज्याच्या मदतीने त्यांची संवेदनशील माहिती तर चोरली जाऊ शकतेच पण बँक खातीही (Bank Account) रिकामी होऊ शकतात. एआय सायबर सिक्युरिटी (AI Cyber Security) कंपनी क्लाउडसेकच्या (CloudSEK) संशोधकांच्या मते, यूट्यूब व्हिडिओद्वारे हल्ल्यांमध्ये 200 ते 300 टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. 

जागतिक पातळीवर 2.5 अब्जाहून अधिक सक्रिय युझर्स असलेला प्लॅटफॉर्म म्हणजे युट्यूब (Youtube) बँकिंग मालवेअर युट्युबद्वारे डिव्हाईसवर स्प्रेड केली जात आहे, ज्यामुळे बँक खाते क्रमांक, CVV आणि पिन यांसारखी माहिती चोरी केली जाऊ शकते.

हल्लेखोर AI जनरेट केलेल्या व्हिडिओच्या मदतीने इंटरनेट वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहेत, अशी माहिती संशोधकांकडून मिळाली आहे. दर तासाला 5 ते 10 क्रॅक सॉफ्टवेअर डाउनलोड व्हिडिओ युट्युबवर वर अपलोड (Youtube Upload Video) केले जातात, ज्याद्वारे वापरकर्ते मालवेअर (Malware) डाऊनलोड करण्यात जातात. त्यामुळे त्याचा वापर माहिती चोरी करण्यासाठी होतो.

आणखी वाचा - Flipkart वर जबरदस्त सेल! स्मार्टफोन मिळणार स्वस्तात, पाहा Sales Details 

युट्युब (YouTube) अल्गोरिदमसाठी असे व्हिडिओ ओळखणे आणि ब्लॉक करणं सोपं नाही. मात्र, युट्युबचे इंजिनियर्स यावर काम करत असल्याची माहिती देखील मिळाली आहे.

कोणती काळजी घ्याल?

युट्युबवरील बहुतेक व्हिडिओ लोकांना Adobe Photoshop, Premiere Pro, Autodesk 3ds Max आणि AutoCAD सारख्या लोकप्रिय सॉफ्टवेअरच्या मोफत आणि क्रॅक केलेल्या आवृत्त्या डाउनलोड करण्यास लिंक शेअर करतात. त्यामुळे युझर प्रवृत्त होतो, असं दिसून आलंय.

दरम्यान, कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी आधी लिंक चेक करून घ्या. https नावाने लिंक असेल तर डाऊनलोड करू शकता. मात्र, अनेक साईट सुरक्षित नसतात. त्यामुळे बँकेतील पैसे गायब होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.