Flipkart वर जबरदस्त सेल! स्मार्टफोन मिळणार स्वस्तात, पाहा Sales Details

Flipkart Sale : तुम्ही अॅपलचा आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी असू शकते. जाणून घ्या Flipkart वरील जबरदस्त सेल डिटेल्स... 

Updated: Mar 14, 2023, 02:06 PM IST
Flipkart वर जबरदस्त सेल! स्मार्टफोन मिळणार स्वस्तात, पाहा Sales Details title=
Flipkart Big Saving Days 2023

Flipkart Sale : Flipkart पुन्हा एकदा ग्राहकांसाठी मोठ्या डिस्काउंट डीलसह सेल सादर करणात आला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इलेक्ट्रॉनिक्स अॅक्सेसरीजवर परवडणाऱ्या डील, फॅशन, खेळणी, क्रीडासाहित्य यावरही भरघोस सूट देण्यात आली. तसेच फ्लिपकार्ट कंपनी अनेक उत्पादनांवर कार्ड ऑफर देखील दिली आहे. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी हा सेल भारतात एक दिवस आधी सुरू होईल. फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहकांना कोणत्या खास ऑफर्स मिळणार आहेत, सेल किती दिवस असेल, सविस्तर जाणून घ्या....

सेल कधी सुरू होईल?

Flipkart Big Saving Days 2023  11 मार्चपासून सुरू झाला असून 15 मार्चपर्यंत सेल असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सवर चांगली सूट दिली जात आहे. 

Flipkart Big Saving Days 2023  मध्ये Google Pixel 6a सेलमध्ये 26,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. त्याची नियमित किंमत 28,999 रुपये आहे. फोनवर दिलेल्या ऑफरमध्ये ICICI बँक क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या 10 टक्के सूटसह किंमत नमूद केली आहे. यासोबतच EMAI व्यवहारांवर ऑफरही आल्या आहेत.

या सेलमध्ये Nothing Phone 1  स्वस्तात विकत घेता येऊ शकतो, ज्याची किंमत 25,999 रुपये आहे. त्याची यादी किंमत 26,999 रुपये आहे. सेलमध्ये Apple च्या iPhone 14 आणि iPhone 14 Plus मॉडेल्सवरही सूट दिली जात आहे. जरी ई-कॉमर्स साइटने त्याच्या किमती निश्चित केल्या नाहीत. हा फोन 70,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. लाइनअपमधील मॉडेल्सच्या किमती रु.79,900 पासून सुरू होतात. यापैकी प्लस मॉडेलची किंमत 89,900 रुपयांपासून सुरू होते.

Google Pixel 7 या सेलमध्ये 46,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो तर त्याची नियमित किंमत 59,999 रुपये आहे. Pixel 7 Pro सेलमध्ये 67,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याची सूचीबद्ध किंमत 84,999 रुपये आहे. या सेलमध्ये Samsung Galaxy S21 FE वरही मोठी सूट दिली जात आहे. बाजारात या फोनची किंमत 37,450 रुपये आहे.