नवी दिल्ली : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आणि बाजारात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या एकापेक्षा एक असे प्लान लॉन्च करत आहेत. आता टेलिकॉम कंपनी वोडाफोनने आपला एक जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे.
एअरटेलने 65 रुपयांचा 1GB डेटा प्लान लॉन्च केला आहे. एअरटेलच्या या प्लानला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने आपला 33 रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. 33 रुपयांच्या या प्लानमध्ये वोडाफोन कंपनी आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड पॅक उपलब्ध करुन देत आहे.
वोडाफोनने आपला 33 रुपयांचा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे. 33 रुपयांच्या या प्लानमध्ये कंपनीने युजर्सला 3G आणि 4G डेटा उपलब्ध करुन दिला आहे. मात्र, हा प्लान कंपनीने सुपर नाईट प्लानसोबत लॉन्च केला आहे. त्यामुळे या प्लानला सीमा ठेवण्यात आली आहे. या पॅकचा लाभ युजर्स नाईट पॅकच्या सीमेअंतर्गत एका रात्रीत करु शकतात. या डेटा पॅकचा वापर युजर्स रात्री 1 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत 4G स्पीडमध्ये करु शकतात. याची कुठलीही निर्धारित सीमा नाहीये.
टेलिकॉम कंपनी एअरटेलनेही आपल्या प्रीपेड युजर्ससाठी नवा प्लान लॉन्च केला आहे. कंपनीने 65 रुपयांचा हा प्लान प्रीपेड युजर्ससाठी लॉन्च करण्यात आला आहे. मात्र, हा प्लान सर्वच युजर्ससाठी नाहीये. या प्लानची वैधता 28 दिवसांची असणार आहे. यामध्ये ग्राहकांना 1GB 3G/2G इंटरनेट डेटा मिळतो.
रिलायन्स जिओने 49 रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग सुविधेसोबतच 1Gb इंटरनेट डेटा मिळतो. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे.