व्होडाफोनचा १५४ रुपयांचा प्लॅन लॉन्च

काही कंपन्यांना कुलूप लावण्याची वेळ आली आहे.

Updated: Jan 31, 2019, 02:20 PM IST
व्होडाफोनचा १५४ रुपयांचा प्लॅन लॉन्च  title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ दूरसंचार क्षेत्रात आल्यापासून बाजारात खळबळ निर्माण झाली आहे. रिलायन्स जिओ स्वस्त प्लॅन उपलब्ध करुन ग्राहकांना आकर्षित करते आहे. काही दूरसंचार कंपन्यांना यामुळे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर काही कंपन्यांना कुलूप लावण्याची वेळ आली आहे. परंतु बाजारात एकेकाळी आपले वर्चस्व गाजवणाऱ्या कंपन्या जिओशी स्पर्धा करताना दिसत आहेत. व्होडाफोन कंपनीने जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्लॅन लॉन्च केला आहे. 

व्होडाफोन आयडियाने असा प्लॅन लॉन्च केला आहे की यात, ग्राहकांना केवळ १५४ रुपयांत १८० दिवसांचा कालावधी मिळणार आहे. या प्लॅनची पूर्ण माहिती कंपनीची वेबसाइट Vodafone.inवर उपलब्ध करुन दिली आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ६०० लोकल मिनिट देण्यात आले आहे. तसेच मध्यरात्री १२ वाजल्यापासून ६ वाजेपर्यंत व्होडाफोन धारकांना फ्री कॉलिंग करता येणार आहे. नॅशनल कॉल केल्यावर प्रतिसेकंद २.५ पैसे दर आकरण्यात येणार आहे. त्याचबरोबर लोकल एसएमएस पाठविण्यासाठी प्रति एसएमएस १ रुपये मोजावे लागणार. सध्या, व्होडाफोन कंपनीने प्रीपेड ग्राहकांसाठी १९९ रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनच्या अंतर्गत ग्राहकांना अनलिमेटेड कॉलिंग, प्रतिदिन १.४ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतात.