केवळ ४९ रुपयांची व्होडाफोनची नवीन ऑफर

'जिओ'ला मात देण्यासाठी व्होडाफोननं कंबर कसलीय... आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी व्होडाफोननं अनेक आकर्षक ऑफर जाहीर केल्यात.

Updated: Oct 31, 2017, 08:06 AM IST
केवळ ४९ रुपयांची व्होडाफोनची नवीन ऑफर  title=

मुंबई : 'जिओ'ला मात देण्यासाठी व्होडाफोननं कंबर कसलीय... आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी व्होडाफोननं अनेक आकर्षक ऑफर जाहीर केल्यात.

त्यातच आता या कंपनीनं बंगाल सर्कलच्या प्री-पेड ग्राहकांसाठी नवीन ऑफर जाहीर केल्यात. जे मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीनं कंपनी नेटवर्कशी जोडले गेले आहेत किंवा जोडले जातील त्यांच्यासाठी हे व्हॉईस आणि डाटा प्लान असणार आहे. वेगवेगळ्या किंमतीचे हे प्लान आहेत. यातील सर्वात स्वस्त प्लान ४९ रुपयांचा आहे... यामध्ये २८ दिवसांसाठी प्रत्येक दिवशी १ जीबी डाटा दिला जाईल.

दुसऱ्या प्लानमध्ये ९६ रुपयांत २८ दिवसांसाठी प्रत्येक दिवशी २ जीबी डाटा दिला जाईल. तिसऱ्या प्लानमध्ये ८४ दिवासांच्या व्हॅलिडीटीसोबत २९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ जीबी डाटा मिळणार आहे. प्रत्येक दिवशी याची लिमिट १ जीबी असेल. सोबतच हे सर्व ग्राहक व्होडाफोन नंबरवर अनलिमिटेड कॉलही करू शकतील.

याशिवाय ४९३ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवासांच्या व्हॅलिडीटीसोबत २९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ जीबी डाटा मिळेलच... सोबत कोणत्याही नेटवर्कवर हे ग्राहक अनलिमिटेड कॉल करू शकतील. 

तसंच कंपनीनं सुपर वीक नावानं एक प्लानही सादर केलाय. यामध्ये ६९ रुपयांत ग्राहकांना अनलिमिटेड लोकल कॉल फ्री मिळतील. महिन्याभरासाठी यात ५०० एमबी डाटा मिळेल. यामध्ये डाटा वापरण्यासाठी एका दिवसाची कोणतीही सीमा नसेल.