मुंबई : Vi (Vodafone- Idea)आपल्या ग्राहकांसाठी बेस्ट ऑफर आणली आहे. आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी कॅशबॅकी ऑफर लागू केली आहे. ही ऑफर प्रीपेड ग्राहकांसाठी आहे. टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना कॅशबॅक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार VIनेही ऑफर देऊ केली आहे. आता आपल्याला प्रत्येक रिचार्जवर कॅशबॅक मिळू शकेल. कसे ते येथे जाणून घ्या ...
भारतातील खासगी टेलिकॉम ऑपरेटर्सपैकी एक असलेल्या Viने ग्राहकांसाठी उत्तम ऑफर जाहीर केली आहे. आता ग्राहकांना प्रीपेड रिचार्जवरही कॅशबॅक मिळू शकेल. कंपनीने काही विशेष रिचार्ज योजनांमध्ये ही ऑफर आणली आहे.
Viने होलीच्या दिवशी सुरु झालेल्या या ऑफरला मार्च फ्लॅश सेल (March Flash Sale) असे नाव दिले आहे. यात Vi ग्राहकांना 199 199. ते 2595 रुपयांपर्यंतच्या रिचार्ज प्लॅनमध्ये कॅशबॅक देण्यात येत आहे.
अहवालानुसार, 199 रुपये, 219 रुपये, 249 रुपये, 299 रुपये, 301, 398 रुपये, 401 आणि 405 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर 20 रुपये कॅशबॅक मिळेल.
प्राप्त माहितीनुसार, Viच्या ग्राहकांना 399 रुपये, 449 रुपये, 499 रुपये, 555, 558 रुपये, 595 आणि 601 रुपयांच्या रिचार्ज योजनेवर 40 रुपये कॅशबॅक मिळेल.
2,595 रुपयांपर्यंतच्या रिचार्ज योजनेत कंपनी 60 रुपयांचे कॅशबॅक देत असल्याचे सांगण्यात येत आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, Vi संपूर्ण वैधतेनुसार कॅशबॅक देत आहे. उदाहरणार्थ, 28 दिवसांच्या वैधतेसह प्लॅनवर 20 रुपये कॅशबॅक आहे. त्याचबरोबर 56 दिवसांच्या वैधता योजनेत 40 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक उपलब्ध आहे. त्याचबरोबर कंपनी 84 दिवसांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 60 रुपयांची कॅशबॅक ऑफर करीत आहे.