VLC Media Player : भारतात VLC Media Player खूप लोकप्रिय आणि वापरण्यात येणारं प्लेयर आहे. आता हे प्लेयर वापरणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतात आता VLC Media Player वापरता येणार नाही आहे. भारताने VLC Media Player वर दोन महिन्यांपूर्वीच बंदी आणली आहे. (vlc media player has been blocked in india says some reports in marathi)
हो, आता VLC मीडिया प्लेयरवर भारतात वापरता येणार नाही. भारता सरकारकडून आणि या कंपनीकडून यासंदर्भात कुठलीही घोषणा केली नाही. VLC मीडिया प्लेयरद्वारे चीनी हॅकिंग ग्रुप सिकाडाने सायबर हल्ल्यांसाठी केला होता. सुरक्षा तज्ज्ञांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली.
हॅकिंग ग्रुप Cicada हा अनेक काळापासून सायबर हल्लामध्ये मालवेअर लोडरसाठी VLC मीडिया प्लेयर वापरत करत होते. या धक्कादायक खुलासानंतर भारतने VLC Media Player वर बंदी आणली आहे.
जर तुम्हाला एखादा व्हिडीओ सुरु करायचा असेल तर यूजर्सला इतर सॉफ्टवेअरचा वापर करावा लागणार आहे. भारत सरकारकडून यापूर्वीही अनेक चीनी अॅप्सवर बंदी आणली आहेत. PUBG Mobile, Tiktok, CamScanner यासारखे अॅप्सवर बंदी आणली आहे.
VLC Media Player यावर भारताकडून का बंदी घालण्यात आली यासंदर्भात सोशल मीडियावर युजर्सकडून मोठ्या प्रमाणात सर्च केलं जातं आहे. भारत सरकारला संशय आहेत की अशाप्रकारचे चीनी अॅप्स भारतीय यूजर्सचा डेटा चीनला पाठवला जात आहे. त्यामुळे खबदारीचा उपाय म्हणून भारत सरकारने VLC Media Player बंदी आणली आहे.
Anyone know why @NICMeity has banned VLC Downloads in India? @internetfreedom pic.twitter.com/lQubbyK0Yi
— Gagandeep Sapra (@TheBigGeek) August 12, 2022