मुलींसोबत चॅट करताना वापरा या टिप्स

जर तुम्ही एखाद्या मुलीसोबत चॅट करु इच्छिता तर मग तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी नक्कीच घ्यावी लागेल. चला तर मग पाहूयात काय आहेत या खास गोष्टी...

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 17, 2017, 08:06 PM IST
मुलींसोबत चॅट करताना वापरा या टिप्स title=
Pic courtesy: Thinkstock photos

नवी दिल्ली : जर तुम्ही एखाद्या मुलीसोबत चॅट करु इच्छिता तर मग तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी नक्कीच घ्यावी लागेल. चला तर मग पाहूयात काय आहेत या खास गोष्टी...

आज आम्ही तुम्हाला अशा काही खास टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे समोरील मुलगी तुमच्याशी चांगल्याप्रकारे बोलणं सुरुवात करेल. तसेच तिच्या मनात तुमच्याबद्दल एक जागाही निर्माण होईल.

मुलींसोबत चॅट करताना खास गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. विचार करा असं काय असू शकतं की ज्यामुळे मुलींना तुमच्यासोबत गप्पा मारायला मजा येईल. 

चॅटींग दरम्यान आत्मविश्वास

मुलीसोबत चॅट सुरु करण्यापूर्वी आपला आत्मविश्वास पाहा. जो तरुण महत्वाकांक्षी असतो असा व्यक्ती मुलींना आवडतो. मुलींसोबत सामान्यपणे आणि स्वाभाविक होऊन गप्पा-गोष्टी करा. जे आहे तेच दाखवा, त्यांना आकर्षित करण्यासाठी खोटं बोलू नका. 

मुलींसोबत चॅट करताना नेहमी तिच्या बाबतीतच बोला. इतरांचा विषय काढू नका. तिला काय आवडतं आणि काय आवडतं नाही याची माहिती घेऊन मग पूढील काम करा.

चूकीचा विषय पडू शकतो महागात

कुठल्याही मुलीला असा प्रश्न विचारु नका की ज्यामुळे तिला दु:ख वाटेल. थोडा संयम बाळगा मग ती मुलगीच तुम्हाला तिच्याबद्दल सर्वकाही सांगेल. त्यानंतर तुम्हाला तिच्या आवडी-निवडी संदर्भात माहिती होईल. मग तुम्ही थोडं रोमॅन्टिक गोष्टी करण्यास सुरुवात करा ज्यामुळे ती तुमच्याकडे आकर्षित होईल. 

मुलींसोबत कधीही खोटं बोलू नका

नेहमी लक्षात ठेवा की, मुलींना खोटं बोलणारी व्यक्ती कधीच आवडत नाही. तसेच जर तुम्ही मुलींना हसवू शकत नाहीत तर मग तुमच्याकडे फारच कमी  संधी आहे.