भारतात TikTok बंद, App ओपन केल्यानंतर येतोय हा मॅसेज

मोदी सरकारने ५९ अॅपवर बंदी घातली आहे.

Updated: Jun 30, 2020, 07:53 PM IST
भारतात TikTok बंद, App ओपन केल्यानंतर येतोय हा मॅसेज title=

मुंबई : मोदी सरकारने सोमवारी TikTok सह 59 चीनी App वर बंदी आणली आहे. आज सकाळी हे अॅप गूगल प्ले स्टोर आणि अॅप स्टोरवरुन हटवण्यात आले. TikTok अॅपही आता उघडत नाहीये.

भारताने टिकटॉक बॅन केल्यानंतर ही यूजर्सच्या स्मार्टफोनमध्ये तो ओपन होत होता. पण आता सरकारने टेलीकॉम कंपनी आणि इंटरनेट सर्विस प्रोवायडर्सकडून अॅप ब्लॉक केलं आहे.

notice_063020063130.jpg

TikTok ओपन केल्यानंतर आता एक नोटीस दिसते. ज्यामध्ये लिहिलं आहे की, आम्ही भारत सरकारने 59 अॅप बंद केल्याची घोषणा केल्यानंतर त्याचं पालन करत आहोत. सगळ्या यूजर्सची प्रायवसी आणि सिक्योरिटी सुनिश्चित करणे ही आमची प्राथमिकता आहे.'

टिकटॉक व्यतिरिक्त काही अॅप अजून काम करत आहेत. भारत सरकारने नोटीस काढल्यानंतर हे इतर अॅपही लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.