AC खरेदी करण्याचा विचार करताय? तर इथे मिळेल तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

Best AC options : तुम्हाला नवा एसी खरेदी करायचा आहे. तर मग कोणता एसी खरेदी कराल. किती टनचा एसी खरेदी कराल. किती स्टार असलेला एसी खरेदी कराल. सगळ्या प्रश्नांची उत्तर या बातमीत मिळू शकतात.

Updated: Mar 16, 2022, 02:32 PM IST
AC खरेदी करण्याचा विचार करताय? तर इथे मिळेल तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं title=

मुंबई : तुम्ही देखील एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही Air Conditioner (AC) ऑनलाईन शॉपिंग साईट वरुन खरेदी करत असाल तर तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोता. Amazon, Flipkart सारख्या साईटवरुन अनेक जण इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतात. एसी खरेदी करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्याल. 

AC खरेदी करताना अनेकांची आवड निवड वेगळी असू शकते. एसीची मॉडल, स्पेस आणि कंडिशन यानुसार एसी खरेदी केला जातो. आधी AC ही लग्जरी गोष्ट मानली जायची. पण आता ती सामान्य झाली आहे.

SPLIT AC की WINDOW AC?

WINDOW AC : हा AC तुम्ही खिडकीत लावू शकता. ज्यामध्ये 1, 1.5 किंवा 2 टन पर्यंतचे मॉडल येतात. WINDOW AC मध्ये सगळेच कंपोनेंट दिले जातात. ज्यामुळे त्याचा आकार मोठा असतो आणि तो स्वस्त देखील असतो.

हा एसी इंस्टॉल करणं परवडणारं असतं. पण यामध्ये आवाज हा मोठा फॅक्टर असतो. आवाजामुळे अनेक जण तो खरेदी करत नाही. पण याचा खर्च Split AC च्या तुलनेच कमी असतो. 

Split AC : Split AC चा उपयोग मोठ्या रुममध्ये एंफिशिययंट कूलिंगसाठी केला जातो. यामध्ये स्प्लिट पार्ट याचा कंप्रेशर असतो. याला सेटअप करणं विंडो एसी पेक्षा जरी खर्चीक आणि अवघड असतं.

टीप - जर तुम्ही भाड्याच्या घरात राहतात किंवा लवकर घरं बदली करतात. तर तुम्हाला विंडो एसी उपयोगी ठरु शकते.

1 Ton की 1.5-ton

रुमच्या साईज नुसार तुम्हाला एसी किती टनचा घ्यावा हे ठरवावं लागतं. सामान्यपणे एसी 1-टन, 1.5-टन आणि 2-टन च्या कॅपिसिटीमध्ये येतात.  जर तुमचा रूम 10 x 15 sq feet पेक्षा मोठा आहे तर तुम्हाला 2 टनचा एसी घ्यावा लागेल. रुम जर त्यापेक्षा कमी असेल तर मग तुम्ही 1.5 टनचा एसी घेऊ शकतात.

जर तुम्ही बेसमेंट किंवा ग्राउंड फ्लोरवर राहत असाल. तुमच्या घरात सूर्यप्रकाश जास्त येत नसेल आणि रुमची साईज 10x10 sq feet असेल तर मग तुम्ही 1 टनचा एसी घेऊ शकतात.

Inverter AC की Non-inverter AC ?

अनेक एसी आता Inverter टॅग सोबत येतात. तुम्ही जेव्हा Inverter एसी खरेदी करतात. तेव्हा तुम्ही कूलिंग कॅपिसिटीला ट्वीक करत वीज वाचवू शकतात. उदा. जर तुमच्याकडे 1.5 Ton inverter AC आहे. तर तो 0.5 Ton आणि 1.5 Ton दरम्यान कार्य करेल. Inverter AC पावर सेविंग फीचर सोबत येतो. त्यामुळे तो महाग असतो.

किती स्टार असणारा AC घ्यावा?

AC मुळे वीज बिलात वाढ होते. त्यामुळे एसी खरेदी करताना तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही 3 स्टार पेक्षा जास्त स्टार असलेला एसी खरेदी करु शकतात.  पण यासाठी तुम्हाला अधिक पैसे देखील मोजावे लागतील. पण यामुळे तुमचं लाईट बिल नक्कीच वाचणार आहे.