जागतिक बाजारात स्मार्टफोन विक्रीमध्ये मोठी घसरण

सॅमसंग आणि ऍपल कंपनीला मोठे नुकसान

Updated: Feb 1, 2019, 01:27 PM IST
जागतिक बाजारात स्मार्टफोन विक्रीमध्ये मोठी घसरण title=

नवी दिल्ली : वर्ष २०१८ मध्ये पहिल्यादांच जागतिक स्मार्टफोन बाजारात मोठी घसरण झाली आहे. काउंटरप्वाइंटच्या रिसर्चनुसार, गुरुवारी ही माहिती देण्यात आली. २०१७ मध्ये जागतिक स्मार्टफोन बाजारात १५५.८८ कोटी युनिट्सची नोंदणी करण्यात आली होती. परंतु,  २०१८ मध्ये या आकडेवारीत ७ टक्क्यांनी  घट होऊन १४९.८३ कोटी युनिट्स झाली आहे. जागतिक स्मार्टफोन बाजारात सॅमसंग कंपनीची १९ टक्के भागीदारी आहे.  ऍपल आणि हुवावे या दोन्ही कंपनीची बाजारात १४-१४ टक्के भागीदारी आहे. त्यानंतर ८ टक्के भागिदारीसह चौथ्या स्थानावर शाओमी स्मार्टफोन कंपनी आहे. काउंटरप्वाइंट रिसर्चचे संचालक तरुण पाठक म्हणाले, अमेरिका, चीन  आणि पश्चिमी युरोप या विकासित बाजारात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे स्मार्टफोन बाजारात घसरण झाल्याचे दिसते. 

स्मार्टफोन ओरिजनल इक्विपमेंट निर्माता कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये नवीन वैशिष्ट्यांचा समावेश करत आहेत. नवीन वैशिष्ट्यांचा समावेश केल्याने स्मार्टफोन खरेदीच्या प्रमाणात मोठी वाढ होऊ शकते, असा त्यांचा समज आहे . परंतु , पाठक म्हणतात की, स्मार्टफोनमध्ये नवीन वैशिष्ट्यांचा समावेश करणे काही गैर नाही. पण त्यामुळे कंपनीला त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करावी लागते आहे. यामुळे ग्राहक नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. एशिया आणि युरोपातील काही देशांत हुवावे, ओप्पो, आणि विवो या कंपन्यांनी दबदबा निर्माण केला आहे. सॅमसंग आणि ऍपल कंपनीला बाजारात मोठी अडचण निर्माण होत आहे. कारण चिनी स्मार्टफोन कंपनी हुवावे आणि वनप्लस यांच्या स्मार्टफोनचे दर खूप कमी असल्यामुळे सॅमसंग आणि ऍपल कंपनीला मोठे नुकसान होते आहे.