Tecno ने लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन...

Tecno मोबाईलने भारतात नवा स्मार्टफोन Tecno Camon i Sky लॉन्च केला.

Updated: Apr 24, 2018, 09:25 PM IST
Tecno ने लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन... title=

मुंबई : Tecno मोबाईलने भारतात नवा स्मार्टफोन Tecno Camon i Sky लॉन्च केला आहे. या कंपनीचा हा पहिला स्मार्टफोन आहे. या अनेक नवे फिचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहक आकर्षित होतील. 

काय आहे फोनची खासियत

Tecno ने या नव्या मोबाईलमध्ये फेस अनलॉकचे फिचर दिले आहे. त्यामुळे या फिचरच्या मदतीने तुम्ही चेहऱ्याने फोन अनलॉक करु शकता. त्याचबरोबर तुमच्या शिवाय हा फोन कोणीही हा फोन अनलॉक करु शकणार नाही. या स्मार्टफोनमध्ये २ जीबी/१६ जीबी रॅम मिळेल. याची किंमत फक्त ७,४९९ इतकी आहे. हा स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक आणि शॅपेन गोल्ड रंगात उपलब्ध आहे.

कंपनी देत आहे इतकी वारंटी

कंपनी या स्मार्टफोनवर १०० दिवसांची रिप्लेसमेंट वारंटी, वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट आणि एका महिन्याची एक्सटेंडेड वारंटी देत आहे. हा फोन अॅनरॉईड ८.१ ओरिओ बेस्ड HiOs 3.3.0 वर चालतो. यात ५.४५ इंचाचा फुल व्हू IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. यात २ जीबी रॅमसोबत 1.28GHz बीट क्वॉड कोर MediaTek MT6739WA प्रोसेसर दिला आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी १६ जीबी असून कार्डच्या साहाय्याने ती वाढवण्यात येईल. या स्मार्टफोनमध्ये रिअरमध्ये PDAF आणि f/2.0 अपर्चरसोबत १३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटमध्ये LED फ्लॅशसोबत ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात 3050mAh ची बॅटरी आहे आणि याचे वजन १३७ ग्रॅम आहे.