Technology : स्मार्टफोनचा कॅमेरा उजव्या बाजूला का नसतो? डाव्या बाजूला असण्याचं 'हे' आहे कारण

Mobile Camera Fact: सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनचा कॅमरा डाव्या बाजुलाच का असतो. कोणत्या कंपनीने याची सुरुवात.

राजीव कासले | Updated: May 20, 2023, 01:49 PM IST
Technology : स्मार्टफोनचा कॅमेरा उजव्या बाजूला का नसतो? डाव्या बाजूला असण्याचं 'हे' आहे कारण title=

Smartphone Camera: स्मार्टफोन म्हणजे सध्या आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. दिवसभर कोणती वस्तू आपल्या सर्वाधिक जवळ असेल तर ती म्हणजे मोबाईल. मोबाईलपासून (Mobile) एक क्षणही दूर राहाणं आपण विचार करु शकत नाही. इतकंच काय तर आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक कामं मोबाईलच्या माध्यमातून केली जातात.  अगदी सकाळी झोपेतून उठण्यासाठी अलार्म असो की आकडेमोड करायची असो... ऑनलाईन खरेदी (Online Shopping) असो की एखाद्या हॉटेलमधून आपला आवडता खाद्यपदार्थ असो सर्व काही मोबाईलमुळे शक्य झालं आहे.

नवा स्मार्टफोन घेताना आपण अनेक गोष्टींचा विचार करतो. म्हणजे तो मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे, त्या मोबाईलची मेमरी (Memory) किती आहे, त्याची बॅटरी लाईफ (Battery Life) किती आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कॅमेरा किती मेगापिक्सल आहे. सेल्फी घेण्यासाठी किंवा एखादे फोटो घेण्यासाठी आपण आता स्मार्टफोनचाच वापर करतो. पण स्मार्टफोनने फोटो काढताना तुम्ही कधी विचार केला आहे का? स्मार्टफोनला मागच्या बाजूला असणारा कॅमेरा डाव्या बाजूलाच का असतो? उजव्या बाजूला का नसतो?

सुरुवातीला मध्ये होते कॅमेरा
मोबाईलमध्ये जेव्हा कॅमेरा सुरुवात झाले तेव्हा ते मधोमध असायचे. हळूहळू फोन आणखी स्मार्ट होत गेले आणि सर्व कंपन्यांच्या मोबाईलचे कॅमरे डाव्या बाजूला आले. आता प्रश्न हा आहे की कॅमेरा एका बाजूला सरकवण्याचं कारण काय? स्मार्टफोनमध्ये कॅमेरा डाव्या बाजूला आणण्याची सर्वात पहिली सुरुवात केली ती अॅपल कंपनीच्या आयफोनने. हळूहळू सर्वच कंपन्यांनी हा पॅटर्न अंमलात आणला. कॅमेरा डाव्या बाजूला आणणं ही डिझाईन डिझाईन नाहीए. तर त्यामागे वेगळच कारण आहे. 

हे आहे खरं कारण?
जगातील बहुतांश लोकं मोबाईलचा वापर हा उजव्या हाताने करतात. अशात मोबाईलच्या मागे डाव्या बाजूला असलेल्या कॅमेराने फोटो काढणं किंवा व्हिडिओ शुटिंग करणं अधिक सोपं जातं. याशिवाय जेव्हा आपण लँडस्केप मोडमध्ये फोटो काढतो तेव्हा ही कॅमेरा फिरवणं अधिक सोपं ठरतं. फोटो किंवा व्हिडिओ शुटिंग करणं सहज आणि सोप व्हावं हे मागचं प्रमुख कारण आहे. 

NOMOPHOBIA
Oppo आणि काऊंटरपॉईंट रिसर्चने (Counterpoint Research) एक अहवाल सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्यांनी काही निरिक्षणं नोंदवली आहेत. भारतातील चार प्रत्येकी चार माणसांमागे तिघांना NOMOPHOBIA जडला आहे. देशातील 72 टक्के लोकं अशी आहेत ज्यांना मोबाईलची बॅटरी 20 टक्के झाल्यावर 'लो बॅटरी एंजायटी' होऊ लगाते. तर 65 टक्के लोकांना अस्वस्थता, असहाय्यता, भीती वाटू लागते. तुम्हालाही जर असं वाटत असेल तर तुम्ही देखील  NOMOPHOBIA ने ग्रस्त असण्याची शक्यता आहे.