ऑनलाईन शॉपिंग करण्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मोबाईलऐवजी मिळणार नाही साबण किंवा दगड, कारण...

मोबाईलच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण काही वेळा ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकाना काही वाईट अनुभव येतात. ऑनलाईन मागवलेल्या सामनाऐवजी भलतंच सामान बॉक्समधून निघतं. विशेषत: महागड्या वस्त मागवताना हे प्रकार घडतात आणि ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागतो.

राजीव कासले | Updated: Oct 27, 2023, 05:06 PM IST
ऑनलाईन शॉपिंग करण्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मोबाईलऐवजी मिळणार नाही साबण किंवा दगड, कारण... title=

Online Shopping Fraud: मोबाईलच्या काळात सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. कपडे असो की जेवण, इलेक्ट्रीक सामान असो की घरगुती सामान सर्व गोष्टी अगदी घरबसल्या आपण मोबाईलवरुन ऑनलाईन (Online) मागवतो. बोटाच्या एका क्लिकवर सर्व गोष्टी घराच्या दारापर्यंत पोहोचवल्या जातात. यासाठी अनेक साईट्स उपलब्ध आहेत. ऑनलाईन मार्केटिंगचं हे प्रमाण भारतात सर्वात जास्त आहे. पण काही वेळा ग्राहकांना वाईट अनुभवाला सामोरं जावं लागतं. मागवेल्या सामानाऐवजी ग्राहकाला वेगळच सामान मिळतं. विशेषत: महागड्या वस्त मागवताना हे प्रकार घडतात, बॉक्स उघडल्यावर आतमध्ये साबण किंवा दगड ठेवलेले असतात, यामुळे नाहक ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागतो.

या कंपनीने आणला नवा प्लान
सोशल मीडियावर अनेकवेा अशा अनेक बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे त्या कंपनीचीही बदनाम होते. पण आता असे प्रकार रोखण्यासाठी फ्लिपकार्ट या ऑनलाईन कंपनीने नवी पद्धत सुरु केली  आहे. या पद्धतीला 'ओपन बॉक्स डिलिव्हरी'  (Open Box Delivery) असं म्हटलं जातं. या पद्धतीत डिलिव्हरी एजंट सामान घेऊन आपल्या घरी आल्यानंतर तो आपल्या समोरच बॉक्स उघडून दाखवेल. जर ते तुम्ही मागवलेलं सामान नसेल तर तुम्ही त्याच एजंटकडून तो बॉक्स कंपनीकडे परत पाठवू शकता. 

कसं काम करते ही पद्धत?
फ्लिपकार्टवर एखाद्या वस्तूची ऑनलाईन ऑर्डर करताना 'ओपन बॉक्स डिलिव्हरी'चा पर्याय निवडू शकता. हा पर्याय निवडल्यानंतर डिलिव्हरी एजंट जेव्हा तुमच्या घरी वस्तू घेऊन येईल, तेव्हा तो आधी बाॉक्स उघडून दाखवेल. तुम्ही मागवलेली वस्तू योग्य असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, पण जर ती वस्तू वेगळीच असेल तर दारातूनच ती वस्तू परत पाठवू शकता. 

ओपन बॉक्स डिलिव्हरीचे फायदे
या पद्धतीमुळे ऑनलाईन फ्रॉड रोखण्यास मदत होणार आहे. 
तुम्हाला योग्य वस्तू मिळण्याची हमखास गॅरंटी
सामन योग्य वाटत नसेल तर ते तुम्ही परत पाठवू शकता.

ओपन बॉक्स डिलिव्हरीचा पर्याय कसा निवडाल?
फ्लिपकार्टवर जेव्हा आपण सामान ऑर्डर करतो, त्यावेळी पेमेंट पेजवर तुम्हाला ओपन बॉक्स डिलिव्हरीचा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडल्यानंतर ओपन बॉक्स डिलिव्हरीसाठी काही शुल्क भरावे लागतील. त्यामुळे ऑनलाईन फ्रॉडपासून वाचवण्यासाठी ही पद्धत एक चांगला पर्याय ठरू शकते.