मुंबई : चीनी कंपनी Xiaomi चे स्मार्टफोन भारतात बरेच लोकप्रिय आहेत. विशेषत: बजेट स्मार्टफोन विभागात कंपनीने आपली पकड कायम ठेवली आहे. म्हणजे जर स्वस्तात मस्त असा फोन घ्यायचा झाला, तर सगळ्यात आधी Xiaomi किंवा MI असंच नाव तुमच्या तोंडात येईल.
परंतु Xiaomiच्या स्मार्टफोनमध्ये लोकांना पॉपअप्स (Pop ups) आणि जाहिरातींन (Ads) विषयी बर्याच तक्रारी आहेत. कोणताही ऍप Open केला. तर प्रथम तुम्हाला जाहिरातीच दिसतील, यामुळे Xiaomi फोन User खूप त्रासले आहेत.
त्यामुळे Xiaomi फोनवरून जाहिरात कशी बंद करावीत याचा उपाय आमच्याकडे आहे.
हा उपाय केवळ एमआययूआय (MIUI) 12 Android Version वर काम करणाऱ्या Xiaomi डिव्हाइसवर काम करतो.
तुम्ही एमआययूआय (MIUI) वर्जन अपडेट केला नसल्यास प्रथम तो अपडेट करावा. जाहिरातबंद (Ad) करण्यासाठी तुम्हाला आधी ऍप च्या Ad ला डिसेबल म्हणजेच अक्षम करावी लागेल.
एमएसए MSA प्रक्रियेमुळे तुम्हाला एमआययूआय सिस्टममध्ये जाहिरात जास्त पाहायला मिळतात. एमएसए (MSA) डिसेबल करण्यासाठी फोन सेटिंग्जवर जा, तेथे पासवर्ड आणि सिक्योरिटी ऑप्शनवर जाऊन Authorisation & Revocation वर क्लिक करा. येथे MSA Option दिसेल त्याला डिसेबल करा. त्याच बरोबर GetApps लाही डिसेबल करा.
पासवर्ड आणि सिक्योरिटी ऑप्शनमध्येच तुम्हाला आणखी Privacy Option दिसेल. येथे Ad service वर जा. येथे तुम्हाला Personalised Ad Recommendations ऑप्शन दिसेल त्याला बंद करा. जेणेकरुन आता तुमचा मोबाईल जाहिरात दिसण्यासाठी डेटा कलेक्ट करणार नाही.
आता एक-एक करुन Ad दाखवणाऱ्या ऍप्सच्या सेटिंग्ज वर जा आणि Ad डिसेबल करा. त्याचप्रमाणे सिक्योरिटी ऍपवर जाऊन Receive Recommendations ला बंद करा. तसेच थीम अॅप उघडा आणि Recommendation पर्याय डिसेबल करा. Tools and More Apps फोल्डर वर लाँग प्रेस करा आणि त्याचे टॉगल बंद करा.
आता डाऊनलोड ऍपच्या Settingमधून Show Recommended Content ला OFF करा, तसेच फाईल मॅनेजर ऍपला ओपन करुन Recommendations ला डिसेबल करा. म्यूझिक ऍपच्या सर्विस आणि सेटिंगमध्ये जाऊन Receive Recommendations ला डिसेबल करा.
या सेटिंगमध्ये चेंजेस करुन तुम्ही Xiaomi च्या स्मार्टफोन ला क्लिन करु शकता.ज्यामुळे तुमच्या फोन मधील Ads चे प्रमाण अगदी कमी होईल.