OnePlus 9 Series ची प्रतीक्षा संपली....'या' फिचर्ससह येणार नवे फोन

वन प्लस लवकरच नववी सीरीज लाँच करणार आहे. OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro सीरीजचं पोस्टरही कंपनीने ट्विटरवरून शेअर केलं आहे. २३ मार्चला या दोन्ही फोनचं लाँचिंग होईल.

Updated: Mar 16, 2021, 08:56 PM IST
OnePlus 9 Series ची प्रतीक्षा संपली....'या' फिचर्ससह येणार नवे फोन title=

मुंबई : वन प्लस लवकरच नववी सीरीज लाँच करणार आहे. OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro सीरीजचं पोस्टरही कंपनीने ट्विटरवरून शेअर केलं आहे. २३ मार्चला या दोन्ही फोनचं लाँचिंग होईल.

हे फोन कोणकोणत्या रंगात येतील, याचीही माहिती देण्यात आली आहे. वनप्लस ९ हा विंटर मिस्ट रंगात, तर वनप्लस प्रो हा मॉर्निंग मिस्ट या रंगामध्ये उपलब्ध असेल. वनप्लस ९ मध्ये ३ कॅमेरा असतील, तर वनप्लस ९ प्रोमध्ये ४ कॅमेरा असणार आहेत.

 

IANS या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार वनप्लस ९ सीरीज 65W चार्जिंग सपोर्ट असणार आहे. OnePlus 9 Lite मध्ये बऱ्यापैकी  OnePlus 8T चे फिचर असतील. वनप्लस ९ मध्ये ८ जीबी रॅम, १२८जीबी स्टोरेज स्पेस असेल. या सीरीजमध्ये Android 11 OS वर्जन असेल.

याआधीह जाहीर केलेल्या एका प्रेस रिलीजमध्ये कंपनीने सांगितलेलं की, OnePlus 9 series मध्ये १४० डिग्री व्यू कव्हर करू शकणारा पॅनोरॅमिक कॅमेराही असेल. कॅमेरासाठीही अडव्हान्स्ड लेन्स असतील.