Activaच्या किंमतीत 2 इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करा, सिंगल चार्जमध्ये 120KM पर्यंत धावणाऱ्या गाडीचे जाणून घ्या फीचर्स

आता कंपनीने यावर्षी त्याच्या किंमतीतही सुधार केल्या आहेत. 

Updated: Oct 6, 2021, 09:14 PM IST
Activaच्या किंमतीत 2 इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करा, सिंगल चार्जमध्ये 120KM पर्यंत धावणाऱ्या गाडीचे जाणून घ्या फीचर्स title=

मुंबई : देशातील इलेक्ट्रिक दुचाकी वाहन उत्पादन कंपनी कोमाकीने गेल्या वर्षी जूनमध्येच XGT-X1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली. त्याचबरोबर, आता कंपनीने यावर्षी त्याच्या किंमतीतही सुधार केल्या आहेत. ज्यामुळे ही दुचाकी आता ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत बाजारात उप्लब्ध आहे. ज्यामुळे आता या दुचाकीची किंमत लिथियम-आयन बॅटरीसह 60 हजार रुपये आणि जेल बॅटरीसह 45 हजार रुपये आहे.

Komaki XGT-X1 Electric Scooterचे फीचर

Komaki XGT-X1 मध्ये टेलिस्कोपिक शॉकर्स, रिमोट लॉक, एंटी-थेफ्ट लॉक सिस्टम, सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग सिस्टम इत्यादी अनेक फीचर्स आहेत. कोमाकी त्याच्या लिथियम-आयन बॅटरीवर 2+1 (1-वर्षची सर्विस वॉरंटी) वर्षाची वॉरंटी आणि लेड-ऍसिड बॅटरीवर एक वर्षाची वॉरंटी देत आहे.

XGT-X1 ला कंपनीने मोठा ट्रंक असल्याचा दावा केला आहे, तसेच ते एका स्मार्ट डॅशबोर्डसह येते. यात रिमोट डायग्नोस्टिक्ससाठी सेन्सर देखील आहे, जे रिमोट लॉकसह येते.

स्कूटरची रेंज उत्तम 

ही इलेक्ट्रिक स्कूटर इको मोडमध्ये 100 किलोमीटर ते 120 किलोमीटर पर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे. जी त्याच्या खरेदीदारांना आणखी प्रभावित करते.

'ई-स्कूटरची विक्री वाढेल'

कोमाकी इलेक्ट्रिक डिव्हिजनचे संचालक गुंजन मल्होत्रा यांनी म्हटले आहे की, या ई-स्कूटरला येत्या काळात अधिक खरेदीदार मिळतील, विशेषत: जेव्हा देशातील इंधनाचे दर त्यांच्या विक्रमी पातळीवर असतील. कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनात ते म्हणाले, "नेहमीप्रमाणे, आम्ही कोमाकी इलेक्ट्रिक वाहनांची फीचर आणि उपयोग लक्षात ठेऊन या वाहनाला बनवले आहे. पेट्रोलचे दर आणि प्रदूषणाची पातळी लक्षात घेता, कंपनीला विश्वास आहे की, इलेक्ट्रिक वाहनांकडे वाटचाल सुरू करण्याची वेळ आली आहे."

किंमतीमध्ये स्पर्धा नाही

सहसा, ऍक्टिव्हा स्कूटरची किंमत सुमारे 85 हजार आहे. पण कोमाकी XGT-X1 च्या नवीन किंमती इतकी कमी आहे की, खरेदीदारांना 2 कोमाकी स्कूटर ऍक्टिव्हा सारख्याच किंमतीसाठी मिळू शकतात.