Tata ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; सिंगल चार्जमध्ये 500 किलोमीटरपर्यंत प्रवास; इतकी असेल किंमत

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमध्ये आता वाहन निर्मात्या कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार लोकांसमोर आणत आहेत.

Updated: Jul 28, 2021, 10:23 AM IST
Tata ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; सिंगल चार्जमध्ये 500 किलोमीटरपर्यंत प्रवास; इतकी असेल किंमत title=

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमध्ये आता वाहन निर्मात्या कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार मॉडेल्स लोकांसमोर आणत आहेत. देशातील प्रमुख वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सनेसुद्धा आपली प्रीमियम हॅचबॅक कार Tata Altroz च्या नव्या इलेक्ट्रिक मॉडेलवर काम करीत आहे. कंपनीची ही पहिली कार असणार आहे. जी ALFA च्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येणार आहे.

 Altroz EV मध्ये इलेक्ट्रिक पावरट्रेन
 Altroz EV  मध्ये टाटा मोटर्स जिपट्रॉन इलेक्ट्रिक पावरट्रेनचा उपयोग करणार आहे. या कारमध्ये अतिरिक्त बॅटरीचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टच्या मते मोठी बॅटरी पॅक 25 ते 40 टक्के अधिक ड्रायविंग रेज प्रदान करते. जी साधारण 500 किलोमीटरपर्यंत असेल.

tata altroz electric vehicle
 
 सिंगल चार्जमध्ये 500 किलोमीटरपर्यंत
 सूत्रांच्या मते, ही कार सिंगल चार्जमध्ये 500 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. Altroz EV, नेक्सॉन ईवीच्या तुलनेत मोठ्या बॅटरी पॅकसोबत लॉंच होऊ शकते. त्यामुळे बॅटरी चार्ज होण्याला जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. कंपनीने याबाबतीत अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. ड्रायविंग रेंजचे आकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार आहेत.
 
 सरकारी योजनांचा लाभ
 Altroz EV इलेक्ट्रिक कारला केंद्र सरकार द्वारा लागू करण्यात आलेल्या FAME II योजनेचा लाभ मिळेल. या योजनेचा परिणाम किंमतीवर दिसून येणार आहे. लॉंच होण्याआधी या कारच्या किंमतीबाबत अंदाज लावणे कठीण आहे परंतु, 10 ते 12 लाख रुपयांच्यादरम्यान या कारची किंमत असण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे.