Tata Nexon ने दणक्यात आणली CNG कार; 'हे' फिचर असणारी ठरणार देशातील पहिली SUV

Tata Nexon आपली CNG कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. यानंतर टाटा नेक्सॉन देशातील एकमेव कार असेल आहे जी पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी असा चारही पर्यायात उपलब्ध आहे. यामध्ये दोन छोटे छोटे सिलेंडर देण्यात आले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Feb 1, 2024, 02:01 PM IST
Tata Nexon ने दणक्यात आणली CNG कार; 'हे' फिचर असणारी ठरणार देशातील पहिली SUV title=

टाटा मोटर्सने आता पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक कारनंतर सीएनजीकडे लक्ष वळवलं आहे. मारुती आणि हुंडाई यांनी सध्या या बाजारपेठेवर कब्जा केला आहे. पण टाटाने आता या क्षेत्रातही अव्वल ठरण्याच्या हेतूने कंबर कसली आहे. टाटा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोपमध्ये कंपनीने आपली Tata Nexon CNG सादर करण्याच्या तयारीत आहे. त्याआधी कंपनीने काही फोटो शेअर केले आहेत. 

सध्या ही कॉन्सेप्ट कार असून, निर्मितीनंतर ती लवकरच ती सर्वांसमोर आणली जाणार आहे. यानंतर ही कार विक्रीसाठी लाँच केली जाईल. सीएनजी कार सध्याच्या नेक्सॉन फेसलिफ्टवरच आधारित आहे. पण सीएनजी कार असल्याने यात काही गरजेचे बदल कऱण्यात आले आहेत. लाँच झाल्यानंतर टाटा नेक्सॉन देशातील एकमेव कार असेल आहे जी पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी असा चारही पर्यायात उपलब्ध असेल. 

Nexon CNG देशातील पहिली टर्बो-चार्ज एसयुव्ही असेल जी सीएनजीवर धावेल. सीएनजी पर्याय शक्यतो नॅच्यूरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह सादर केला जातो. पण पहिल्यांदाच टाटाने नेक्सॉन आय-सीएनजी कॉन्सेप्टला 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड रेवॉट्रॉन इंजिनसह सादर केलं आहे. पेट्रोलवर धावल्यानंतर हे इंजिन 120 पीएसची अधिक पॉवर आणि 170 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतं. पण सीएनजी मोडमध्ये कारच्या कामगिरीत थोडं अंतर पाहायला मिळू शकतो. 

टर्बो पेट्रोल इंजिनसह Nexon वेगवेगळे ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5MT, 6MT, 6AMT आणि 7DCA मध्ये येते. पण सीएनजी व्हेरियंटमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी ट्रांसमिशन पर्याय मिळतील. 

इंधन टाकी आणि बूट स्पेस:

टाटा मोटर्सने आपल्या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सीएनजी कारमध्ये येणारी बूट स्पेसची समस्या जवळपास संपवलीच आहे. कंपनीने Nexon CNG मध्येही आपल्या इतर मॉडेल्सप्रमाणे 30 लीटरच्या ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. यामध्ये दोन छोटे सिलेंडर देण्यात आले आङेत. ज्यामुळे तुम्हाला बूट स्पेसमध्ये काही तडजोड करावी लागणार नाही. 

फिचर्स काय आहेत?

Nexon i-CNG मध्ये उत्तम आणि अत्याधुनिक फिचर्स मिळतील अशी आशा आहे. याच्या रेग्यूलर व्हर्जनमध्ये जबरदस्त सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. अशात या कारमध्ये लीकेज प्रूफ मटेरियल, मायक्रो स्वीच, सिंगल अॅडव्हान्स एसीयू, थर्मल इंसिडेंट प्रोटेक्शन, फ्यूएल स्विच, लीक डिटेक्शन आणि मॉड्यूलर फ्यूएल फिल्टर सारखे फिचर्स दिले जाऊ शकतात. ही एसयुव्ही थेट सीएनजीवर सुरु होईल. 

काय असेल किंमत?

कार लाँच होण्याआधी तिच्या किंमतीबद्दल काही बोलणं थोडं घाईचं ठरु शकतं. पण Nexon i-CNG पेट्रोलच्या तुलनेत महाग असेल. या दोन्ही कारच्या किंमतीत 1 ते 1.5 लाखांचं अंतर असू शकतं. सध्याच्या नेक्सॉनची किंमत 8.10 लाखांपासून सुरु होते.