Best Selling Car In India During October: देशात दर महिन्याला ऑटो क्षेत्रातील गाड्यांच्या विक्रीचा आकडा समोर येतो. यावरून देशभरातील ग्राहकांची पसंती कोणत्या गाडीला आहे, याबाबत कळतं. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मारुति ब्रेझा (Maruti Brezza) विक्रीत अव्वल स्थानी होती. आता ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा टाटा नेक्सननं (Tata Nexon) बाजी मारली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये टाटा मोटर्सने नेक्सन कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या एकूण 13767 युनिट्सची विक्री केली आहे. टाटा नेक्सनच्या विक्रीत 36 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक पर्यायामध्ये उपलब्ध आहे. आता तर सीएनजी वर्जनदेखील तयार केलं जात आहे. या गाडीचं भारतीय रस्त्यावर टेस्टिंग सुरु आहे.
ह्युंदाई क्रेटाने ऑक्टोबर महिन्यातील विक्रीत दुसरं स्थान पटकावलं आहे. ऑक्टोबर 2022 महिन्यात 11880 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये याच महिन्यात कंपनीने 6,455 युनिट्सची विक्री केली होती. तर टाटाची पंच सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही तिसऱ्या स्थानावर आहे. कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये 10982 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 8453 युनिट्सची विक्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 30 टक्क्यांची वाढ झाली आहे.
जिंकलंस भावा! Hummer E-Cycle पाहिली का? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
मारुति ब्रेझाने टॉप-5 मध्ये जागा बनवली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यान या गाडीला सर्वाधिक पसंती होती. दोन महिन्यात गाडीची विक्री अव्वल स्थानी होती. ऑक्टोबर महिन्यात कंपनीने 9941 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 8032 युनिट्सची विक्री केली होती. तसं पाहिलं तर कंपनीने विक्रीमध्ये 24 टक्क्यांची वाढ केली आहे.