नवी दिल्ली : भारतीय वाहन निर्माता कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आपली टिगॉर (Tigor) कार ऑटोमॅटीक ट्रान्समिशनसह लॉन्च केली आहे.
टाटा मोटर्सने टिगॉर एमटी दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये XTA आणि XZA यांचा समावेश आहे. कंपनीने या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत क्रमश: ५.७५ लाख रुपये आणि ६.२२ लाख रुपये (एक्स-शोरुम, दिल्ली) मध्ये ठेवली आहे. दोन्ही मॉडेल आपल्या मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या मॉडल्सपेक्षा ४० हजार रुपयांनी महाग आहेत.
टाटा मोटर्सच्या टिगॉर ही मारुती सुजुकीच्या डिझायर कारला टक्कर देणार आहे. टिगॉर XTA एएमटी ही कार मारुतीच्या डिझायर VXI एएमटीपेक्षा ९८ रुपयांनी स्वस्त आहे. तर, टिगॉर एएमटीची XZA व्हेरिएंट डिझायरची ZXI ऑटोमेटीक पेक्षा १.२७ लाख रुपयांनी स्वस्त आहे.
AMT ट्रान्समिशन असलेल्या टाटा टिगॉरमध्ये केवळ १.२ लीटर, ३ सिलिंडर पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. ही कार ८५ BHP ची पावर आणि ११४ एनएमचं टॉर्क जनरेट करते.
ईको आणि सिटी मोडसोबतच टिगॉर एएमटीमध्ये नवा स्पोर्ट्स फिचर देण्यात आलं आहे. या कारचं ब्रेक रिलीज केल्यास गाडी तुरंत पिक-अप करते. XTA पेक्षा ५० हजार रुपयांनी महाग XZA व्हेरिएंट गाडीचा विचार केला तर यामध्ये प्रोजेक्ट हेडलँम्प, एलॉय व्हील, फॉग लँम्पमध्ये क्रोम इंसर्ट देण्यात आले आहेत.