नवी दिल्ली : सोशल मीडियावर फेक लाईक्स बनवण्याचा कारभार अलीकडे झपाट्याने वाढला आहे. सेलिब्रिटी, नेता, राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटना कोणीही असो आजकाल सर्वांना जास्तीत जास्त लाईक्स हवे असतात. सोशल मीडियावरील अधिकाधिक लाईक्स बद्दल सर्वचजण जागरूक असतात. कारण प्रसिद्ध मिळवण्याचे सोशल मीडिया एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे.
बॉलिवूडमधील नवोदीत कलाकार फेम मिळवण्यासाठी सोशल मीडियावर पैसे देऊन फेक लाईक्स खरेदी करतात. मीडिया रिपोर्टनुसार, काही लोक फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब स्टेस्टसवर फेक लाईक्स मिळवण्यासाठी लाईक्स वाढवणाऱ्या कंपन्या आणि ब्रोकर्सना हजारो रुपये देतात.
मीडिया रिपोर्टनुसार, काही कंपन्या आणि ब्रोकर्स १३० रुपयांमध्ये सेलिब्रिटी, नेते मंडळींना १० हजार लाईक्स देतात. हे लाईक्स फेक आयडीतर्फे वाढवले जातात. सोशल मीडियावर लाईक्स वाढवण्याची इच्छा असणारे लोक २ दिवसात १० हजार लाईक्सची मागणी करतात. यासाठी कंपन्या १३० ते ७८० रुपयांपर्यंत चार्जेस घेतात.
इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार अलीकडे क्लिक फार्म्सचा बिजनेस जोर धरत आहे. त्याचबरोबर क्लिक फार्मतर्फे प्रॉडक्ट रिव्हयू देखील केला जात आहे. रूसच्या आउटसोर्स्ड क्लिक फार्मच्या एका ब्रोकरने सांगितले की, "पोस्टवर दिवसरात्र काम करणाऱ्या लोक सोशल मीडियावर फेक प्रोफाईल बनवण्यासाठी लोक बाईट्सचा देखील वापर करतात. जे अनेकदा पोस्टला लाईक किंवा शेअर करतात. पण या लाईक्सची संख्या ग्राहकाच्या पेमेंटवर अवलंबून आहे. मात्र या ग्राहकाचे नाव जाहीर न करण्याची अट असते. १०,००० लाईक्स किंवा शेअर मिळवण्यासाठी कंपन्या २ ते १२ डॉलर म्हणजे सुमारे १३० ते ७८० रुपये खर्च करतात.