एका दिवसात हीरो मोटोकॉर्पने विकल्या ३ लाखाहून अधिक दुचाकी

देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्मिती करणारी कंपनी हीरो मोटोकॉर्पने धनत्रयोदशीच्या दिवशी रेकॉर्ड केला. 

Updated: Oct 21, 2017, 01:18 PM IST
एका दिवसात हीरो मोटोकॉर्पने विकल्या ३ लाखाहून अधिक दुचाकी title=

नवी दिल्ली : देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्मिती करणारी कंपनी हीरो मोटोकॉर्पने धनत्रयोदशीच्या दिवशी रेकॉर्ड केला. 

या कंपनीने धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल ३ लाखाहून अधिक मोटारसायकल्स आणि स्कूटर्सची विक्री झाली. आतापर्यंतचा एखाद्या ऑटो कंपनीचा विक्रीमधील सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. 

याआधी या कंपनीने सप्टेंबर महिन्यात सात लाखाहून अधिक दुचाकी वाहनांची विक्री केली होती. इतकंच नव्हे तर वित्तीय वर्षातील दुसऱ्या तिमाहीत २० लाखाहून अधिक दुचाकी वाहनांची विक्री करण्याचा रेकॉर्डही हीरोच्या नावावर आहे. 

देशाच्या उत्तर, मध्य आणि पूर्व भागामध्ये हीरोच्या बाईक्स तसेच स्कूटर्सना मोठी मागणी आहे. त्यामुळेच हीरोला हा रेकॉर्ड करता आला.