मुंबई : आज बाजारात मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन येत जात असतात. त्यामुळे नेमका कोणता फोन घ्यावा हे सगळ्यात मोठे आव्हान आपल्यासमोर असते. तुमचे बजेट ५००० रुपये असेल तर तुमच्यासाठी आहे हे जबरदस्त पर्याय
इंटेक्स अॅक्वा स्टार ४जी
३८६१ रुपयांना मिळणाऱ्या या फोनचा डिस्प्ले ५ इंचाचा आहे. यात एक जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी, ८ मेगापिक्सेल कॅमेरा, १ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर आहे. तसेच 2000 एमएएचची बॅटरी आहे.
झोलो इरा १एक्स ४जी
पाच इंचाचा डिस्प्ले असून याची किंमत ४७७७ रुपये आहे. यात एक जीबी रॅम, ८ जीबी इंटरमल मेमरी, ८ मेगापिक्सेल कॅमेरा आणि पॉवर बॅकअपसाठी २५०० एमएमएच बॅटरी आहे. अँड्रॉईड व्हर्जन ६.० आहे.
इंटेक्स अॅक्वा ५.५ वीआर
ई कॉमर्स वेबसाईट वर या फोनची किंमत ४८०० रुपये इतकी आहे. यात ५.५ इंचाचा डिस्प्ले १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलाय. २८००एमएएच बॅटरी आहे. अँड्रॉईड ६.० देण्यात आलेय.
इंटेक्स अॅक्वा अमेझ प्लस
५.५ इंचाचा डिस्प्ले असून या फोनची किंमत ४५९९ इतकी आहे. यात १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल मेमरी. ५ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा आणि बॅक कॅमेरा देण्यात आलाय. हा ६.० अँड्रॉईडवर काम करतो.
कार्बन ऑरा ४जी
ई कॉमर्स वेबसाईटवर या फोनची किंमत ५२२५ रुपये आहे. यात ५ इंचाचा डिस्प्ले, १ जीबी रॅम, ८ जीबी मेमरी, ८ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय.