फोन रिप्लेस करण्याआधी करा हे काम, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

तुम्ही तुमचा स्मार्टफोन रिप्लेस करण्याआधी ही गोष्ट कराच...नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान 

Updated: Nov 13, 2021, 04:23 PM IST
फोन रिप्लेस करण्याआधी करा हे काम, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान title=

मुंबई: आजकाल स्मार्टफोन बदलणं किंवा रिप्लेस करणं ही खूप साधारण गोष्ट झाली आहे. लोक 3 ते 6 महिन्यात आपला फोन रिप्लेस करून नवीन मोबाईल घेतात. एक्सजेंच ऑफर्समुळे स्मार्टफोन खरेदी करण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. आज प्रत्येकाच्या हातात नवा स्मार्टफोन आहे. बऱ्याचदा जुना फोन रिप्लेस करताना आपल्याकडून काही डेटा राहातो किंवा काही चुका आपण करतो. ज्याचा फटका आपल्याला होऊ शकतो. 

तुमचा जुना स्मार्टफोन नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी विकत असाल किंवा तुम्ही तुमचा फोन फॅक्टरी रीसेट करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. फॅक्टरी डेटा रिसेट करण्याची एक खास पद्धत तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. 

तुम्ही फोन फॅक्टरी डेटा रिसेट केला तर तुमच्या फोनमधील सर्व डेटा निघून जातो. याचा अर्थ सर्व डेटा डीलीट होतो. तुमचा फोन नव्यासारखा पुन्हा दिसू लागतो. तुमचा फोन रिसेट करण्याआधी त्यामधील डेटाचा बॅकअप घ्यायला विसरू नका. 

कसं करायचं फोनला फॅक्टरी डेटा रिसेट?

फोन रिसेट करण्यापूर्वी हे लक्षात असू द्या की तुमचा स्मार्टफोन पूर्ण चार्ज असेल. रिसेट करताना तुम्ही फोन चार्जिंगवर ठेवा. आता तुमच्या स्मार्टफोनवरील सेटिंग्ज उघडा आणि त्यात 'सिस्टम' पर्याय निवडा. 'रीसेट' निवडा आणि नंतर फॅक्टरी रीसेट वर क्लिक करा.

तिथे तुम्हाला तुमचा पासवर्ड विचारण्यात येईल. हा पासवर्ड दिल्यानंतर तुमचा फोन रिसेटवर जाणार आहे. तुम्हाला तुमचा डेटा हवा असेल तर रिकव्हरी मोड हा पर्याय निवडा. त्यानंतर रिसेट करा. ज्यांना हा पर्याय दिसत नाही त्यांसाठी वेगळी ट्रिक आहे. 

रिकवरी मोड हा पर्याय तुमच्या फोनमध्ये नसेल तर पावर बटनच्या मदतीनं रिकव्हरी मोड सिलेक्ट करा. तिथून तुमचा डेटा रिकव्हर होऊ शकतो. त्यानंतर फोन रिसेट करा. नाहीतर तुमचे महत्त्वाचे फोन, फोटो आणि डेटा हा कायमस्वरुपी डीलीट होऊ शकतो. त्यामुळे डीलीट करताना रिकव्हर करून किंवा बॅकअप घेऊनच नंतर फोन रिसेट करा.