मुंबई : निनावी संदेश पाठवून तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी 'सराहा' हे अॅप मदत करते.
इंटरनेटवर आणि तरूणांमध्ये या अॅपची क्रेझ झपाट्याने वाढत आहे.
'सराहा'ची वाढती क्रेझ पाहून आपल्याला संदेश पाठवणारी व्यक्ती नेमकी कोण आहे ? हे जाणून घेण्यासाठीही काहीजण प्रयत्न करू लागले. संदेश पाठवणार्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी ' सराहा एक्सपोज्ड' या वेबसाईटने आम्हांला भेट द्या असे आवाहन केले होते. पण दावा खोटा असून केवळ क्लिक मिळवण्याच्या उद्देशाने ' सराहा एक्सपोज्ड' ही साईट उघडण्यात आली आहे. असे 'फर्स्ट पोस्ट' ने वृत्तात म्हटले आहे.
आठवड्याभरात सुमारे 1 कोटीहून अधिक लोकांनी सराहा अॅप डाऊनलोड केले आणि तितक्याच झपाट्याने त्याविषयी अफवाही पसरायला सुरवात झाली आहे. पण 'सराहा' अॅप च्या धोरणानुसार कोणत्याही युजरची माहिती उघड केली जाणार नाही.
कुठे मिळते सराहा अॅप?
निनावी मेसेज पाठवणं या मूळ हेतूसाठी सराहा अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. सौदीतील ३ तरूणांनी मिळून या अॅपची निर्मिती केली आहे.
भारत, अमेरिका, फ्रांस , लंडन अशा तीसहून अधिक देशात गूगल प्ले स्टोअर आणि आय ओ एस वर हे अॅप उपलब्ध आहे.
सराहा अॅपद्वारा तुम्ही निनावी मेसेज पाठवू शकता पण तुम्हांला आलेल्या मेसेजला रिप्लाय करण्याची सोय नाही.