हा आहे २०१७ चा सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन, तुमच्याकडे कोणता आहे?

आज अनेकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे फोन आढळतात. प्रत्येकाची फोनच्या बाबतीत वेगवेगळी चॉईस असते. यावर्षी कोणता फोन सर्वाधिक पसंत केला गेला याबाबत तुम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Nov 27, 2017, 11:21 AM IST
हा आहे २०१७ चा सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन, तुमच्याकडे कोणता आहे? title=

मुंबई : आज अनेकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे फोन आढळतात. प्रत्येकाची फोनच्या बाबतीत वेगवेगळी चॉईस असते. यावर्षी कोणता फोन सर्वाधिक पसंत केला गेला याबाबत तुम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल.

२०१७ चा सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन

२०१७ चा सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन म्हणून सॅमसंग गॅलेक्सी एस 8 ची निवड करण्यात आली आहे. डिवाईस वर्ल्ड 2017 च्या परिषदेत या फोनला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

फोनला खूप चांगला रेस्पॉन्स

- मोबाईल इंडियन आणि टेलिअॅनालिसिने केलेल्या सर्वेक्षणात या फोनला सर्वात अधिक मतं मिळाली. फोन जेव्हा लाँच झाला तेव्हाच या फोनला खूप चांगला रेस्पॉन्स मिळाला होता.

ही स्मार्टफोनची आहे वैशिष्ट्ये

हायटेक वैशिष्ट्यांसह हा फोन लॉन्च केला गेला होता. कंपनीने प्रथमच या मॉडेलमध्ये काही बदल केले आहेत. ऑयकॉनिक होम बटण स्मार्टफोनवरून काढण्यात आलं आहे. यामुळे फोन अधिक मोठा आणि आकर्षक दिसतो. 

डोळ्याने करु शकता फोन अनलॉक

कंपनीने सुरक्षासाठी स्मार्टफोनमध्ये प्रथमच आयरीस फीचर दिले आहे. म्हणजेच युजर आपल्या डोळ्याने देखील फोन अनलॉक करु शकतो. एस 8 सोबत एस 8 प्लसला देखील चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. एस 8 ची किंमत 53,900 रुपये आहे.