SAMSUNG ने लॉन्च केला Galaxy Tab Active3

सॅमसंगचा आणखी एक टॅब येणार बाजारात

Updated: Sep 29, 2020, 11:17 PM IST
SAMSUNG ने लॉन्च केला Galaxy Tab Active3 title=

मुंबई : दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग (Samsung) ने नवा गॅलेक्सी टॅब एक्टिव 3 (Galaxy Tab Active3) लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. या टॅबमध्ये प्रोडक्टिविटी आणि सेफ्टीवर अधिक लक्ष देण्यात आले आहे. एक्टिव 3 हा 1.5 मीटरच्या इन्बॉक्स प्रोटेक्टिव कवरसह उपलब्ध होणार आहे. जो धुळ आणि पाण्यापासून त्याचं संरक्षण करेल. ज्याचा आयपी रेटिंग 68 आहे.

डिस्प्ले आणि रॅम

टॅबमध्ये 8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन रिजॉल्यूशन 1920 x 1200 पिक्सल आहे. हा एक्सीनॉस 9810 चिपसेटने ऑपरेट होतो. या टॅबमध्ये 4 जीबी रॅम आणि 64/128 जीबी स्टोरेजची सुविधा देखील देण्यात आली आहे. जी मायक्रो एसडी कार्ड टाकून वाढवली जावू शकते.

अँड्रॉयड 10

अँड्रॉयड 10 वर चालणाऱ्या या टॅबमध्ये डीईएक्स सपोर्ट देण्यात आलं आहे. ज्यामुळे टॅब वापरताना डेस्कटॉप वापरल्याचा अनुभव घेता येणार आहे. सुरक्षिततेसाठी यामध्ये केनॉस देखील वापरण्यात आला आहे.

बॅटरी आणि कॅमेरा

एक्टिव 3 मध्ये 5,050 ची बॅटरी देण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला 5MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी रिअर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

गॅलेक्सी टॅब एक्टिव 3 मंगळवारी यूरोप आणि आशिया खंडातील काही ठिकाणी उपलब्ध झाला आहे. लवकरच तो सगळ्या मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे.