सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू, स्वस्तात मिळताहेत हे स्मार्टफोन

वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटचे सेल संपल्यानंतर आता सॅमसंगने सेल सुरू केला आहे. सॅमसंगच्या या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर जबरदस्त सूट दिली जात आहे. २५ सप्टेंबरला सुरू झालेला हा सेल ३० सप्टेंबरपर्यंत सुरू आहे.

Updated: Sep 26, 2017, 04:17 PM IST
सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू, स्वस्तात मिळताहेत हे स्मार्टफोन title=

मुंबई : वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटचे सेल संपल्यानंतर आता सॅमसंगने सेल सुरू केला आहे. सॅमसंगच्या या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर जबरदस्त सूट दिली जात आहे. २५ सप्टेंबरला सुरू झालेला हा सेल ३० सप्टेंबरपर्यंत सुरू आहे.

ग्राहकांना या सेल दरम्यान सॅमसंग मोबाईल, टेलिव्हिजन, वेअरेबल्स, आयटी प्रॉडक्ट्स, मोबाईल सर्व्हिस पॅक आणि ऑडिओ अ‍ॅक्सेसरीजवर सुद्धा ऑफर दिली जात आहे. यासोबतच सॅमसंगच्या ई-कॉमर्स साईटवरून ICICI बॅकच्या कार्डवर खरेदी केल्यास ५ टक्के एक्स्ट्रा कॅशबॅक दिला जाईल. 

सॅमसंग गॅलक्सी ऑन मॅक्स -

या स्मार्टफोनवर १ हजार रूपयांची सूट दिली जात आहे. हा स्मार्टफोन आता १५ हजार ९०० रूपयांना मिळणार आहे. या फोनवर एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. 

सॅमसंग गॅलक्सी ऑन नेक्स्ट-

सॅमसंग गॅलक्सी ऑन नेक्स्टचं ६४ जीबी व्हेरिएंट १५ हजार ९०० रूपयांना मिळतो. आता या सेलमध्ये या फोनची किंमत १३ हजार ९०० रूपये इतकी करण्यात आली आहे. 

सॅमसंग गॅलक्सी ऑन ७ प्रो-

सॅमसंग गॅलक्सी ऑन ७ प्रो या स्मार्टफोनवर १ हजार ४०० रूपयांचं डिस्काऊंट दिलं जात आहे. हा फोन आता ७ हजार ५९० रूपयांना मिळत आहे. तशी या फोनची किंमत ८ हजार ९९० रूपये आहे. 

सॅमसंग गॅलक्सी जे३ प्रो -

सॅमसंग गॅलक्सी जे३ प्रो स्मार्टफोनवर ९०० रूपयांचं डिस्काऊंट दिलं जात आहे. त्यनुसार आता हा फोन ७ हजार ९० रूपयांना मिळत आहे. 

सॅमसंग गॅलक्सी ७ -

सॅमसंग गॅलक्सी ७ या स्मार्टफोनची किंमत ७ हजार २०० रूपये इतकी आहे. आता सेलमध्ये हा फोन ६ हजार ५९० रूपयांना मिळत आहे. 

सॅमसंग गॅलक्सी ५ प्रो -

सॅमसंग गॅलक्सी ५ प्रो स्मार्टफोनवर १ हजार रूपयांची सूट दिली जात आहे. त्यानुसार हा फोन आता ६ हजार ४९० रूपयांना मिळत आहे. या फोनवर कॅशबॅक ऑफरही दिली जात आहे. 

सॅमसंग गॅलक्सी ५ -

सॅमसंग गॅलक्सी ५ या स्मार्टफोनवर ९१० रूपयांची सूट दिली जात आहे. आता हा फोन सेलमध्ये ५ हजार ९९० रूपयांना मिळत आहे. तर तशी या फोनची मुळ किंमत ६ हजार ९०० रूपये आहे.