जिओची ग्राहकांसाठी आणखी एक खास सेवा

रिलायन्स जिओने टेलिकॉम कंपनींमध्ये जबरदस्त स्पर्धा तयार केली आहे. लॉन्च झाल्यापासून जिओने मागे वळून नाही पाहिलं. सर्व टेलिकॉम कंपन्यांना नुकसान होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पण जिओ नवीन नवीन ऑफर आणून त्यांच्यावर मात करत आहे.

Updated: Jun 26, 2017, 12:50 PM IST
जिओची ग्राहकांसाठी आणखी एक खास सेवा title=

मुंबई : रिलायन्स जिओने टेलिकॉम कंपनींमध्ये जबरदस्त स्पर्धा तयार केली आहे. लॉन्च झाल्यापासून जिओने मागे वळून नाही पाहिलं. सर्व टेलिकॉम कंपन्यांना नुकसान होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पण जिओ नवीन नवीन ऑफर आणून त्यांच्यावर मात करत आहे.

जिओने आता पुन्हा एकदा ग्राहकांसाठी नव्या ऑफर आणल्या आहेत. ज्यानुसार कंपनीच्या या ऑफरचा 600 हून अधिक शहरांना फायदा होणार आहे. जिओचं सिम आता तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे. जिओने सिमची होम डिलीवरी करण्याचा निर्णय घेतला आहे. 90 मिनिटात जिओचं हॉटस्पॉट घरापर्यंत पोहोचवणार आहे.

जिओच्या सिमसाठी इच्छुक ग्राहकांनी जिओच्या वेबसाईटवर जाऊन बुकिंग करायची आहे. तुम्हाला आधी तुमचा पिन कोड टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या पत्त्यावर सिम जिलीवरी होणार की नाही याची माहिती मिळेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ई-मेल आयडीवर इनविटेशन मेल मिळेल.

कंपनी जिओ सिमच्या होम डिलीवरीसाठी कोणतेही शुल्क घेणार नाही. पण यासाठी तुम्हाला जिओचं अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. त्यानंतर कूपन जनरेट करावं लागेल. कूपनच्या पिनने तुम्ही होम डिलीवरीसाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊ शकता. यासाठी तुम्हाला आधार क्रमांकाची गरज पडेल. तर रिलायन्स जिओच्या काही निवडक शहरांमध्ये जिओ फाई हॉटस्पॉट ९० मिनिटांच्या आत देणार असल्याचं कंपनीचा दावा आहे.