नवी दिल्ली : इंटरनेट आणि फोननंतर आता रिलायन्स जिओ फिक्स्ड ब्रॉडबँड तसेच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये धमाल करणार आहे.
रिलायन्स जिओ येत्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला ३०हून अधिक शहरांत वेगवान स्पीड असलेली फायबर टू होम (FTH) ब्रॉडबँड सेवा सुरु करणार आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना टीव्हीसोबतच इंटरनेटचीही सुविधा मिळू शकते. ज्यामध्ये ग्राहकांना 1 GBPS प्रीमियम स्पीड मिळणार आहे.
जवळपास 30 शहरांतील 10 कोटींहून अधिक परिवारांपर्यंत पोहोचण्याचा रिलायन्स जिओचा प्लॅन तयार आहे. सुत्रांच्या मते, पहिल्या टप्प्यात 5 कोटी परिवावारांना सेवा पुरवली जाईल. जिओ पूर्वीपासूनच 3 लाख किलोमीटरहून अधिक ऑप्टिक फायबरचं जाळं पसरवलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या वर्षीच एका बैठकीत संकेत दिले होते की, जिओची हायस्पीड असलेली ब्रॉडब्रँड सेवा देण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
प्रीमियम सेवेत ग्राहकांना 1 GBPS हा प्रीमियम स्पीड मिळणार आहे. सेट टॉप बॉक्स या पॅकेजचा एक भाग असेल. यावर टीव्ही चॅनल, हायएंड गेमिंग, ऑन डिमांड व्हिडिओची ऑफर सादर केली जाईल. प्रत्येक युजरकडून सरासरी 1,000 ते 1,500 रुपयांची कमाईची जिओला अपेक्षित आहे. मात्र, या प्लान संदर्भात रिलायन्स जिओने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये.
सध्या रिलायन्स जिओ मुंबई आणि दिल्लीमध्ये ट्रायलवर 100 MBPS स्पीड आणि 100 GB डेटासोबत इंटरनेट सेवाचं निरीक्षण करत आहे. कंपनी 4,500 रुपयांच्या सिक्युरिटी डिपॉझिटवर विशेष राऊटर देत आहे.